Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

लाडसावंगी चौका महामार्गावर दोन मोटारसायकल चा समोरासमोर अपघात दोन ठार

लाडसावंगी / संदीप शिंदे
लाडसावंगी चौका महामार्गावर रविवारी संध्याकाळी सात वाजे दरम्यान दोन मोटार सायकल चा लाडसावंगी शिवारातील गवळीमाथा वाकाणावर समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले.
लाडसावंगी जि.प. गटातील आडगाव सरक जवळील जुनी पाणीवाडी येथून संतोष पाठोळे वय तिस वर्ष हिरो स्पेल्डर मोटारसायकल क्रमांक MH 20 BU 3138 वरून लाडसावंगी कडे येत होता तर लाडसावंगी गावाकडून हातमाळी गावाकडे अनिस शेख वय २५ वर्ष स्टार मोटार सायकल क्रमांक MH 20 AQ 1837 वरुन जात असताना लाडसावंगी शिवारातील गवळी माथा वाकाणावर दोन मोटार सायकल चा समोरा समोर अपघात झाला.यात अनिस शेख जाग्यावर मृत्यू झाला तर संतोष पाठोळे यांचा लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.अपघात होताच शेतातुन घराकडे निघालेले उपसरपंच
संजय पचलोरे व माजी ग्रामपंचायत सदस्य ढवळीराम बैनाडे यांनी जखमीना उचलून लाडसावंगी च्या आरोग्य केंद्रात आनले. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे, सरपंच सुदाम पवार, व करमाड पोलिसांना घटनेची माहीती दिली असता करमाड पोलिस ठाण्याचे साय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील,बिट जमादार,सिराज पठाण,प्रभाकर जाधव, ताराचंद घडे आदी ने पंचनामा केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close