अजिंठा घाटात ट्रक व टाटा मॅजिक चा समोरासमोर अपघात;दोघे जखमी

अपघातग्रस्त ट्रक पलटी,दोन्ही वाहनांच्या कॅबीन चा चुराडा
सागर भुजबळ/mh20live Network
फर्दापूर दि.23(प्रतिनिधी) महामार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे फर्दापूर(ता.सोयगाव)येथील अजिंठा घाटात ट्रक व लोडींग टाटा मॅजिक मध्ये समोरासमोर भीषण अपघात होवून या अपघातात दोन्हीही वाहनांच्या कॅबीन चा चुराडा होवून ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील दोघे जण जखमी झाले घटनेच्या माहिती वरुन फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून जखमीना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अजिंठा येथे रवाना केले हा अपघात दि.23 सोमवार रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडला असून घाटातील महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थे मुळेच हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की आंध्रप्रदेश येथील निलगिरीच्या लाकडाचा ट्रक (क्र.एपी 16 टिई 7137) हा औरंगाबाद कडून जळगावच्या दिशेने जात असतांना सोमवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास फर्दापूर येथील अजिंठा घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे एका अवघड वळणावर सदरील लाकडाने भरलेला ट्रक अनियंत्रित होवून चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक घाटातील दरीच्या दिशेने झेपावला त्याच सुमारास ट्रक चालक प्रसंगावधन राखून ट्रक दरीत कोसळण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना समोरून येणारा लोडींग टाटा मॅजिक(क्र.एमच 21 बिएच 3071)ला ट्रकने समोरासमोर धडक देवून ट्रक पलटी झाला,या अपघातात दोन्ही अपघातग्रस्त वाहनांच्या कॅबीनचा चुराडा होवून ट्रक मधील चितू बाबु (वय 35) आणि कोंदा बाबु (वय 30) रा.आंध्रप्रदेश हे दोघेजण जखमी झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे जमादार बाजीराव धनवट पो.कॉ नारायण खोडे हो.गा.किरण सपकाळ,विष्णू घुले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अजिंठा येथे रवाना करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.दरम्यान आंध्रप्रदेश येथील दोन्ही जखमींना हिंदी,इंग्रजी मराठी भाषा अवगत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने बराच वेळ संवाद साधून ही दोन्ही जखमी चे पूर्ण नाव आणि पत्ता कळू शकला नाही,दरम्यान घाटातील रस्त्याच्या दुरावस्थे मुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांन कडून करण्यात आला आहे.