Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नायगाव येथील भारत जिनिंग मधील कापसाच्या गंजली आग लागून वीस हजार किव्टन कापूस जळुन खाक

नायगाव / शेषेराव कंधारे mh20live Network
नायगाव शहरात असलेल्या भारत जिनिंग मधील असलेल्या कापसाच्या गंजली गुरुवार दि.28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले व त्यात जवळपास वीस हजार किव्टन कापूस जळून भस्मसात झाला. ही आग आटोक्यात आणली असून आग कशी लागली त्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.
नायगाव शहरातील शेळगाव रोडवर असलेली भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून या जिंनिग मध्ये मुखेड ,कंधार लोहा देगलुर सह नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापसू खरेदी येत असतो. आजघडिला या जिनिंगमध्ये खरेदीस झालेला व विक्री आलेला जवळपास वीस हजार क्विंटल कापूसाच्या गजीला आग लागली आहे. लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने मोठा पेट घेत उग्ररुप धारण केले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच नायगाव नगर पंचायतची अग्नीशमनची गाडी दाखल झाली. त्यानंतर नांदेड ,कंधार देगलूर अहमदपुर, मुखेड नायगाव येथील अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यामुळे आग अटोक्यात आनली आहे.
नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा चिखलीकर, नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर,नायगाव नगर पंचायतीचे उपध्यक्ष विजय पाटील चव्हाण,तहसीलदार सुरेखा नांदे यांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. या आगीत जवळपास वीस हजार किव्टण कापूस जळाला असल्याचा अंदाज आहे. परंतु आग कशामुळे लागली हे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close