Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आगळेवेगळे हळदीकुंकू व तिळगूळ मैत्रीसंवादाचे आयोजन



औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय महिला फेडरेशन व राजर्षी शाहू मल्टीस्टेट कॉ. ऑप. बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने आगळेवेगळे हळदीकुंकू व तिळगूळ मैत्रीसंवाद या बहुचर्चित कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे यात विधवा, परित्यक्ता, एकल व सर्व जा़तिधर्माच्या स्त्रियांना एकत्र बोलावून त्यांचा सन्मान केला जातो, तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या सु:खदु:खावर बोलते केले जाते.

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

त्यामुळे आपल्या अडचणींवर मात करायची असेल तर एकमेकींशी संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे व महिलांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ.स्मिता पानसरे,राज्यअध्यक्ष, भारतीय महिला फेडरेशन मा मीनाक्षी साळुंके, ब्रांच मॅनेजर, राजर्षी शाहू मल्टीस्टेट कॉ.ऑप. बॅंक यांची उपस्थिती तर श्रीमती दीपमाला चव्हाण, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद शाळा,
कॉ. तारा बनसोडे मराठवाडा संघटक, अंगणवाडी युनियन कॉ. वसुधा कल्याणकर राज्यसहसचिव, भारतीय महिला फेडरेशन फहमुनिस्सा खान व शाहीस्ता का़दरी, जमात-ए-इस्लामे हिंद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण


हा कार्यक्रम – रविवार, 31 जाने. 2021
दुपारी 2.00 वा स्वामी विवेकानंद शाळा, सावित्रीबाई फुले चौक, गणेशनगर, औरंगाबाद येथे होईल. सर्व मैत्रिणींना विनंती आहे की आपण मोठ्या सँख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन संघटनेच्या कॉ. मनिषा बागुल, अॕड नीता शिंगणे, प्राजक्ता भवर, शितल एलांडे, निर्मला वाकोडे, सारिका कांबळे, शकुंतला दांडगे, लक्ष्मी चळवदे, अर्चना चोपडा, स्मिता पटारे, चंद्रकला गायकवाड, सीमा वाघमारे, प्रमिला मानकरी, शुभांगी धायडे, गीता सवाई, रेखा बोधक, ढगे बाई, चित्रा चव्हाण, छाया पगारे, सोनु चव्हाण, रायबोले बाई, वैशाली बोरकर, सुरेखा काथार, मीरा वाघ, चंद्रकला वाहूळे, मानसी अकोलकर, मानसी सुरासे, स्वाती ढाकरगे, आदींनी केले आहे.

हेही वाचा मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव उतरलंय आंदोलनात:साष्टपिंपळगाववासीयांचा आत्मदहनाचा इशारा

तिळगुळ घ्या, फक्त गोड नाही तर
सत्य बोला, संवाद करा, मैत्री करा

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close