Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन, अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे संस्थानचे आवाहन

बुलडाणा– शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निर्बंधांमुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी न करण्याचे आवाहन शेगाव संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालावली आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पत्नी तसेच नातवंडे, असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने श्री भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाचे निर्बंध असल्याकारणाने अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी असल्याने शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये असे शेगाव संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close