Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद शहरात : भिकाऱ्यांचा कायापलट करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

औरंगाबाद : शिवजयंती निमित्त औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपतर्फे शुक्रवारी(दि.१९) औरंगाबाद शहरात आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शहरातील भिकाऱ्यांना स्वच्छ, टापटीप करुन जंटलमन बनवत शिवरायांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.

गरीब निराधार मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज पुन्हा एकदा दाखवुन दिले. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पर्वावर भिकाऱ्यांना जंटलमन बनवण्याचा ध्यास मनी घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला. दरवर्षी शिवजयंतीस वेगवेगळ्या ठिकाणी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हे कार्य करते. आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसर या भागात असणाऱ्या बेवारस निराधारांना एकत्र करण्यात आले.

दरवर्षी शिवजयंती च्या दिनी वेगवेगळ्या ठिकाणी ही सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था हे कार्य करत आहे.आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून त्यांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ करत आहे. सुमित स्वतः गरीब निराधार नागरिकांना न्याय देण्यासाठी उपस्थित होते..त्यावेळी
स.पोलिस.निरक्षक संजय बनसोडे,विशाल टिंप्रवार,भरतभाऊ कल्याणकार,ज्यूनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने.समाजसेविका पुजा पंडीत.त्यावेळी माणुसकी समुह जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर,वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी, चेतन पाटील. हे उपस्थित होते.व सहकार्य केले..

..
महाराष्ट्रातील बेवारस निराधार अवस्थेत फिरणाऱ्या भिकाऱ्याला दहा रुपये भेट देणे बंद करा यांचे घर कुठे चुकले त्यांना कामाला लावा त्यांच्या घरी नेऊन त्यांना आई-वडील आहेत का विचारपूस चौकशी करून त्यांच्या घरच्यांकडे स्वाधीन करा त्यांची दाढी कटिंग स्वच्छ आंघोळ करून त्यांना कामाला लावा हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेला आहे आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये साखरेपेक्षा जास्त बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुप न्याय दिलेला आहे आणि जो पर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे जसे की दूनिया मे आकर कमाया खूप हिरे क्या मोती मगर कफन को जेब नही होती हे सुमित यांचे वाक्य साध्य ठरताना दिसते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा या उक्तीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्य करीत आहे..।

सुलक्ष्मी सेवाभावी संस्था संस्थापक. समाजसेवक सुमित पंडित

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close