Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे घाटीला 31 डिसेंबर पर्यंत हस्तांतरण करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 28 :  शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरातील (घाटी) 68 कोटी रुपयांच्या 250 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील हेल्थ सर्विसेस कन्स्लटन्सी कार्पोरेशनने (एचएससीसी) 31 डिसेंबर 2020 पूर्वी घाटी प्रशासनास हस्तांतरित करावे. तत्पूर्वी इमारतीतील सर्व सोयी सुविधा पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. या बैठकीस घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे विशेष कार्य अधिकारी  डॉ. सुधीर चौधरी,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, एचएससीसीचे राजकुमार शर्मा, उपअभियंता कदीर अहमद, सहायक अभियंता श्री. सय्यद, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. नंदनवनकर, प्र.उप अभियंता एस.बी. डोंगरे, ए.बी. काळे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, सन 2016 बांधकामास सुरुवात करण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकाम 2018 अखेर पूर्ण झाले. सदरील इमारतीत आवश्यक असणाऱ्या साधनसुविधा योग्य प्रमाणात व दर्जेदार असाव्यात. याबाबींची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. तद्नंतर एचएससीसीने हस्तांतरणाची प्रकिया 31 डिसेंबर 20 अखेर पूर्ण करावी. या इमारतीसाठी आवश्यक असलेली कामे तत्काळ करून रुग्णांसाठी सर्व सोयींयुक्त असे सुपरस्पेशालिटी  हॉस्पीटल असावे.  यासाठी इमारतीतील वॉटरप्रुफिंग, वॉटरप्रुफिंग बाँड, स्वतंत्र पाण्याची व्यवस्था, विजेच्या आवश्यक असणाऱ्या तारा आदी सुविधांचा आढावा घेत त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे श्री. चव्हाण अधिकाऱ्यांना म्हणाले. त्याचबरोबर घाटी प्रशासनाचे मुलींसाठी असलेल्या वसतिगृहास मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा. घाटी परिसरातील अतिक्रमण काढावे, अशा सूचनाही संबंध‍ित अधिकाऱ्यांना श्री. चव्हाण यांनी दिल्या. 

सुरूवाातीला डॉ. येळीकर यांनी  घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल आणि इतर अनुषंगिक करावयाच्या बाबींबाबत जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांना माहिती दिली.  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

 1. It is with sad regret to inform you that because of the Covid pandemic BestLocalData.com is shutting down at the end of the month.

  We have lost family members and colleagues and have decided to shut down BestLocalData.com

  It was a pleasure serving you all these years. We have made all our databases available for $99 (All of it for $99) for those interested.

  Kind Regards,
  BestLocalData.com
  Dotty

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close