Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

राखीव वनक्षेत्रात नांगरटी करणारे ट्रॅक्टर जप्त कन्नड वनविभागाची कारवाई , ट्रॅक्टर चालक फरार

mh20live Network

–कन्नड ( प्रतिनिधी)  तालुक्यातील पळसवाडी येथील राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या ट्रॅक्टर ने नांगरटी करून अतिक्रमण  करणाऱ्यारे  ट्रॅक्टर जप्त करण्यात कन्नड प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचार्यांना यश आले आहे.      मराठवाड्यात केवळ दोन ठिकाणी वनविभागाचे क्षेत्र शिल्लक राहीलेले आहे. त्यात पुन्हा अवैधरित्या अतिक्रमण सुरू असल्याने  दोन्ही ठिकाणचे वनक्षेत्र संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसत आहे . तेव्हा वृक्षमित्र , प्राणी मित्र , महसूल प्रशासन ,सजग नागरिक यांनी पुढाकार घेऊन वनक्षेत्र व तेथील वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की  दिनांक १८ आक्टोबर रोजी कन्नड वनपरिमंडळ अधिकारी प्रविण कोळी व कन्नड वनरक्षक शेख हे नियतक्षेत्र कन्नड अंतर्गत मौजे पळसवाडी  राखीव वनक्षेत्र फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर १४६  फॉरेस्ट गट नंबर ११  मध्ये सामूहिक फिरस्ती करत असताना  त्यांचे निदर्शनास असे आढळून आले की,  लाल रंगाचे भुरकट विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे  ट्रॅक्टर अवैधरित्या  शेतीसाठी नांगरटी करीत असतांना त्याला हटकले असता वाहनचालकाने ट्रॅक्टर थांबवून  फरार झाला. सदर ट्रॅक्टर वनकर्मचारयांनी मक्रणपूर नर्सरी येथे आणले या ट्रॅक्टरवर  भारतीय वनअधिनियम १९२७  वनकायद्यानुसार  वनगुन्हा दाखल करून  ट्रॅक्टर व लोखंडी फाळ जप्त करण्यात आला आहे . सदर प्रकरणांचा पंचनामा व कारवाई यशस्वी करण्यासाठी वनपरिमंडळ अधिकारी  प्रवीण कोळी , वनरक्षक एम.ए शेख यांनी परिश्रम घेतले. सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे , कन्नड प्रा वनपरीक्षेत्र अधिकारी डब्ल्यू . .ए . सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रविण कोळी , वनरक्षक एम .ए. शेख पुढील तपास करीत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनक्षेत्र अबाधित राहणे आवश्यक आहे. स्वत:पुरता वैयक्तीक फायदा घेण्यासाठी अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणधारकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या मदत केल्या जाते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.  पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे भविष्यात अनेक आपत्तींना निमंत्रण मिळते. पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यायाने स्वत:ला वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना गावकऱ्यांनी तसेच इतरांनी सहकार्य करु नये. असे आवाहन कन्नड वनपरिमंडळ अधिकारी प्रविण कोळी यांनी केले आहे .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close