Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडाशेतीविषयक

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंब्यासाठी बीड मध्येही ट्रॅक्टर तिरंगा रॅली


बीड :गेली 59 दिवसापासून शेतकरी विरोधी तीन कायदे व कामगार विरोधी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठान मांडून बसले आहेत परंतु केंद्राचे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही, मोदींनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा न बनवता समाधानकारक तोडगा काढण्याची गरज आहे, हाडे गोठवणारी थंडी पाऊस घारा अशा संकटाचा सामना पंजाब हरियाणा दिली युपी चे शेतकरी करीत आहेत. एम एस पी चे शेतकऱ्यांना असलेले सरक्षन या कायद्यामुळे रद्द होणार आहे. देशात 85 % शेतकरी 2 एकरच्या आतले आहेत त्यांना करार पद्धतीने भांडवलदारांना शेती देणे परवडणारे नाही या कायद्याने साठेबाजिला प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे कृत्रिम अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. जीवन आवश्यक वस्तू कायद्याचे संरक्षण या कायद्याने सम्माप्त होणार आहे सरकार ची देहबोली अत्यंत चुकीची आहे.

 हे कायदे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार आहेत.एकदा शेती भांडवलदाराच्या विळख्यात गेली की शेतकरी बरबाद होणार आणि तो शेतमजुर होणार असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत कामगाराचे संरक्षण या कामगार विरोधी कायद्यामुळे रद्द होऊन लाखोच्या संख्येने कामगार बेरोजगार होणार आहेत सरकारने सार्वजनिक उद्योगाची खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. मै देश बिकणे नही दुंगा  अश्या थापा मारून देशाऐवजी देशातील उद्योग धंदे सरकारने विक्री करायला सुरुवात केली आहे पूर्णपणे संघाच्या प्रतिगामी अजेंडा राबवण्याचे काम सरकार करीत आहे. ज्या शेकऱ्यांना या कायद्याचे दुष्परिणाम समजले आहेत ते जीवाची पर्वा न करता लढत आहेत सीमेवर थंडीमुळे जवळपास 90 शेतकऱ्यांचा मुर्त्यू झाला आहे. हा मुर्त्यु नैसर्गिक नसून ही शेतकऱ्याची हत्याच आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला जाणे आपले कर्तव्य आहे म्हणूनच अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती सयुक्त किसान मोर्चा व शेतकरी संघर्ष समिती सह बीड जिल्ह्यातील तमाम पुरोगामी लोकशाहीवादी पक्ष संघटनानी एकत्र येऊन या आंदोलनास पाठिंबा दिला असल्यामुळे आजची ही ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढली आहे. सरकारने तत्काळ हे तीन कायदे रद्द करावेत असे आवाहन प्रा. सुशीलाताई मोराळे, प्रा. पंडित तुपे , दादासाहेब मुंडे कॉम्रेड महादेव नागरगोजे कॉ करुणा टाकसाळ गणेश ढाकणे सुजाता मोराळे  बबन आंधळे किस्किंदा जाधव कमलबाई गर्कळ वंजारी सेवा संघाचे मोहन आघाव अमोल राठोड गजानन ससाणे,भाई  दत्ता प्रभाळे, दत्ता जाधव युवा उद्योजक संघ अध्यक्ष , नागेश मिठे पाटील डॉक्टर ह्श्मी विजय पवार मुकुंद उबाळे नितीन चावण भीमाशंकर याधव अविनाश दर्पे शामसुंदर जाधव अक्षय दळवी  इत्यादींनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close