Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नायगाव तहसील परिसरात तोबा गर्दी

६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु; काही ग्रामपंचायती बिनविरोधाच्या वाटेवर

नरसीफाटा / शेषेराव कंधारे            

नायगाव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, दि.२८ व २९ डिसेंबरला जवळपास ८६१   ग्रामपंचायत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर दि.३० डिसेंबर  शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात उमेदवरांसह समर्थकांची तोबा गर्दी झाली होती. नायगाव – नांदेड महामार्गावरील बाजुलाच हरनटेकडीवर तहसील कार्यालय असल्याने दूरदूरवर पर्यंत वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. मागील पंचवार्षिक काळात शासकीय योजना व इतर विकास कामात भ्रष्टाचार झाल्याने गोर-गरीब व सर्व सामान्यांना वंचित ठेवल्या गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत दाखल होण्यासाठी अनेकांनी कंबर कसली असून, यामध्ये युवा वर्गांचा व महिला मंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.          नायगाव तालुक्याचे आजी – माजी नेत्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहून आपल्या पक्षाचा झेंडा कसा फडकविता येतील. यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत यासाठी त्यांनी ज्या ग्रामपंचायती बिनविरोध काढल्या जातील त्या ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ असे आमिष दाखविले आहे. मात्र प्रतिष्टेची निवडणूक असलेल्या गावपुढाऱ्यानी आपल्या हाती सत्तेची चाबी असावी म्हणून निवडणुक बिनविरोध होऊ न देता नामांकन दाखल करून आपले वर्चत्सव सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठ पणाला लावली आहे. मोजक्या ग्रामपंचायती सोडल्या तर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणूक रंगतदार होणार असून, ऑनलाईन व ऑफलाईन नामांकन भरण्यासाठी २३ डिसेंबर पासून शहरातील ऑनलाईन केंद्रासह तहसील कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाण गर्दी झाली होती.दि.३० डिसेंबर नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होऊ नये म्हणून निवडणूक प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली असली तरी अनेक गावच्या पैनल प्रमुखांनी नायगाव- नांदेड महामार्गापासुन ते तहसील कार्यालय पर्यंत वाहनाच्या रागाच्या रांगा लावून  हजारो समर्थकांना सोबत घेऊन नामांकन दाखल केले. नामानकं दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रीय महामार्ग व परिसर कार्यालय परिसर गर्दीने जाम झाला होता. वाहतुकीची वर्दळ हटविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या नाके नऊ आल्याचे चित्र पाहावयास मिळले आहे. आजच्या तारखेत नरसी, होटाळा, माजरंम, गडगा, कुंटुर, बरबडा,  घुगराळा, धुप्पा,शेळगाव गौरी, कुंचेली,बेद्री, धानोरा,भोपाळा, वजिरगाव, टाकळी बु.मेळगाव,हुस्सा  आदींसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले.  यावेळी कोरोणा प्रदुभाव अजून पुर्णताह संपलेला नसतानाही तहसील व पंचायत समितीच्या परिसरात मास्क व सैनिटायजरचा वापर केल्याचे दिसून आले नाही.      दि.३१ डिसेंबर रोजी नामांकन अर्जाची छाननी ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस असून, त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदान दि.१५ जानेवारीला होऊन, मतमोजणी दि.१८ जानेवारी रोजी होणार आहे. यंदा सरपंच पदाचे जाहीर झालेले आरक्षण रद्द झाले असून, आता निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून बोलल्या जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close