Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांचा विकास करणारना. संदीपान पा. भुमरे , रोहयो व फलोत्पादन मंत्री

पैठण :   महाराष्ट्रातील सरकार मध्ये मा. ना. संदीपान पा. भुमरे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांनी पैठण तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचा धडका सुरू केला व त्याच अनुषंगाने पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांच्या विकासासाठी आज भूकंप व पुनर्वसन मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेत पुनर्वसन विभागांच्या अधिकाऱ्यांची मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली . पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व  शेतीमधील पिकांचे झालेले नुकसान तसेच पिंपळवाडी या पुनर्वसित गावात पाणी आल्यामुळे बाधित झालेल्या घरांच्या पुनर्बांधणी साठी नुकसान भरपाई मिळणे बाबत व पैठण तालुक्यातील  पुनर्वसित गावातील शेकऱ्यांसाठी शेती पोहोच रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने  आणि पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावाच्या प्रलंबित विकासासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . मा. ना. संदीपान पा. भुमरे यांनी मांडलेल्या वरील कामाबाबत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी मा. पुनर्वसन मंत्री यांनी दिले . तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना या गावांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पैठण येथे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असून या महाकाय जलाशयाने शेकडो गावे व हजारो एकर शेती आपल्या कवेत घेतली . धरणासाठी आपली घरे , शेती देऊन तालुक्यात इतरत्र विस्थापित झालेल्या नागरिकांचे शासनातर्फे पुनर्वसन करण्यात आले . अशा पुनर्वसित गावांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व गावांच्या विकासाठी मा. ना. संदीपान पा. भुमरे यांनी आज भूकंप व पुनर्वसन मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीमध्ये पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्ष वाढल्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close