Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

लेखनी गहान ठेवणार्‍यांनी आत्मचिंतन करावे:जेष्ठ पत्रकार आश्रोबा केदारे

मानवत /अनिल चव्हाण

मानवत येथील शासकीय विश्राम गृहावर नूकतीच पत्रकारांच्या निवडीची बैठक संपन्न झाली या वेळी पत्रकारांना मार्गदर्शन करतांनी ते बोलत होते.
पत्रकारांची जवाबदारी हि समाजातील वाईट घटनेवर प्रकाश टाकून त्या विषयी आवाज उठविण्याचे कार्य केले पाहिजे . पत्रकार गूलाम झाला तर सर्व समाज गूलाम होतो. अनिष्ठ रूढी परंपरा , व दंडेलशाहीला थारा मिळतो व त्या मूळे समाजावर अनेक संकटे कोसळत असतात.
पत्रकारांनी आपल्या लेखनीतून अशा बेबंदशाहीवर फट्कार मारून त्यांचा पायबंद करावा .त्या मूळे सामान्य जनतेला त्यांचा न्याय , हक्क मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करण्याची वेळ आली आहे.

========================================
०अन्याया विरूध्द अपनी लेखन चालवणारा खरा पञकार असतो.
०मानवत शहरातील पञकारानी आत्मचिंतन करावे.
०अन्याया विरूध्द लेखन चालवणारे पञकार आहेत का ?
०निवड होत असते आणि सत्कार होत असतो.

०पारायण पत्रकारामूळे पत्रकारीता रसातळाला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की , मानवत पत्रकारसंघाची महत्वाची बैठक येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहा मध्ये संपन्न झाली .या बैठकीला प्रमूख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांनी त्यांनी पत्रकारीतेतील ढासळत असलेल्या मनोबला विषयी आपले प्रखड मत व्यक्त केले पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. त्यातूनच समाजाचे प्रतिबिंब प्रकाशित व तेजोमान होत असते.
आजची पत्रकारीता हा संशोधनाचा विषय बनत चालला असून या विषयी पत्रकारांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे,

ना खिचो कमान को ना तीर निकालो.
जब तोफ मूखाबील है तो अखबार निकालो.

सरकारचं डोक ठिकाण्यावर आहे का ?.

असा दम देणारे पत्रकार काळाच्या ओघा आड गेले तरी त्यांची लेखणी आजही तळपळत असतेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आग्रलेख आजही समाजाला व पत्रकारांना दिशा देण्याचे कार्य करीत असते.
पण सद्याची पत्रकारीता हे समाजातील विकृतिवर फटकार मारण्या ऐवजी दूर्लक्ष करीत असल्या मुळे पत्रकारांच्या लेखनी विषयी उलट सूलट चर्चा होत असतांनी दिसत आहे त्या मुळे लोक शाहीचा चौथा स्तंभ काही उपटसूंभानी खिळ खिळा करण्याचा उपक्रम सूरू केला असून या कडे पत्रकारांनी लक्ष देऊन सर्वानी असेच ऊभे राहून एकत्र येण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
शोधपत्रकारीता या कडे दूर्लक्ष होत असले तरी सर्वांनी अनिष्ठ परंपरा , चाली रीती बरोबरच वाढते गून्हेगारी , फोफावत असलेला भ्रष्ट्राचार , दंडेलशाही , आणि समाजात पत्रकारा विषयीची भावना या विषयी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे, निवडी तर होतच राहतील , हारतूरे तर मिळतीलच पण एक वेळ जर पत्रकार समाजाच्या नजरेतून उतरला तर( पडला ) उभे राहणे अवघड आहे.

त्या साठी पत्रकारांनी सामाजीक बांधिलकीचा घेतलेला वसा टाकून न देता तो अधिक व भक्कम पणे बळकट करून ढासळत असलेली पत्रकारीता मजबूत करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन जेष्ट पत्रकार संपादक आश्रोबा केदारे यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करतांनी खंत व्यक्त केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close