धक्कादायक;गटविकास अधिकारी यांच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे यांची प्राणज्योत मालवली

गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पैठण/ किरण काळे
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणारे ग्राामविकास अधिकारी संजय हरीभाऊ शिंदे यांनी गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या जाचास कटाळून बिडकीन येथिल धर्माई नदी जवळील ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणारी जुन्या विहिर परिसरात दि.१९ जानेवारी मंगळवारी सकाळी दहा वाजेदरम्याण विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते उपचार दरम्यान आज दि.२१ गुरूवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचा म्रुत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातुन विविध ठिकाणाहुन ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात सकाळपासुनच ठिय्या मांडुन दोषिंवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लाऊन धरली होती.तसेच जि.प.अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी देखील आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडुन बसले होते.
सदरील घटनेची फिर्याद मयत शिंदे यांची पत्नी प्रतिभा संजय शिंदे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादित असे म्हटले आहे की,माझे पती संजय शिंदे हे दि.१६ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता घरी आले तेव्हा ते प्रचंड तनावाखाली दिसत होते.त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की,अडीच वाजेच्या सुमारास बीडीओ विजय लोंढे हे ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन येथे आले होते.नंतर मला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जात असतांना बिडीओ लोंढे हे मला म्हणाले की,मी दि.१८ जानेवारी रोजी परत कार्यालयात येणार आहे.मला तुमचे ग्रामपंचायत कार्यालयाचे रेकाँर्ड तपासायाचे आहेत.म्हणुन तुम्ही सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहावे असे तोंडी सांगितले.तसेच १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा मंजुरी साठी मला सोमवारी दि.१८ जानेवारी रोजी पाच लाख रूपये बिडीओ व ईतर अधिकारी यांना द्यावे लागतील अशी हकीकत मयत शिंदे यांनी आपल्या पत्निस सांगितले तसेच इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करायची असे बोलुन ते प्रचंड तणावाखाली आले होते.
दि.१८ जानेवारी रोजी पती संजय शिंदे हे घरातुन सकाळ सहा वाजता पैठण येथे मतमोजणी ड्युटी असल्याने घरातुन बाहेर गेले.सायंकाळी मी घरी असतांना पती संजय शिंदे व त्यांच्या सोबत सखाराम दिवटे व तुळशिराम पोतदार हे आमच्या घरी आले.त्यावेळी पती संजय शिंदे यांनी मला घरातुन सत्तर हजार रूपये आणून दे असे सांगितले.मी कपाटातील सत्तर हजार रूपये पती संजय यांना दिले.ते सत्तर हजार व त्यांच्या जवळील तीस हजार असे एकुन एक लाख रूपये त्यांनी माझ्या समक्ष सखाराम दिवटे यांंच्या हातात दिले.
दिवटे यांना शिंदे म्हणाले की माझ्याकडे आता एवढेच पैसे आहे.तुम्ही सांभाळुन घ्या अशी विनंती दिवटे यांना केली.परंतु दिवटे हे पती संजय यांना म्हणाले की,बिडीओ लोंढे व विस्तार अधिकारी भास्कर साळवे हे पाच लाख रूपये पेक्षा कमी पैसे घेणार नाहीत.असे म्हणुन ते दोघे पैसे सोबत घेऊन निघुन गेले.नंतर राञी साडेदहा वाजेच्या सुमारास पती संजय हे घरी आले असता ते अत्यंत उदास व तणावाखाली दिसत होते.त्यांना मी पुन्हा काय झाले असे विचारले असता त्यांनी पत्नीला सांगितले की,आता माझे काही खरे नाही बिडीओ लोंढे यांना आज एक लाख रूपये देऊन सुध्दा त्यांचे काही समाधान झाले नाही.त्यांनी मला उरलेले चार लाख रूपये आणुन देण्यास दि.१९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे.पैसे न दिल्यास ते माझ्या विरूद्ध खोटी कार्यवाही करून बडतर्फ करण्याची धमकी दिली आहे.तसेच ग्रामसेवक पोतदार व कांबळे हे मला म्हणतात की,बिडीओ लोंढे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पाच लाख रूपये देऊन टाक अन्यथा ते तुला बडतर्फ करून टाकतील असे म्हणतात.तसेच लोंढे,साळवे,दिवटे,पोतदार यांच्या सांगण्यावरून मुद्दामहून मला ञास देत आहे.दिवटे यांना माझ्या जागी बिडकीन ग्रामपंचायतला ड्युटी हवी होती.त्यांना ती जागा मिळाली नाही.याचा दिवटे यांना शिंदे यांचा राग होता म्हणुन ते ञास देत असल्याचे शिंदे यांनी घरी सांगितले.
दि.१९ जानेवारी रोजी तणावाखाली असलेले संजय शिंदे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्यांना तात्काळ बिडकीन येथिल खाजगी हाँस्पिटल मध्ये दाखल केले होते.त्यावेळी पत्नीने त्यांना विचारपुस केली असता ते म्हणाले की,बिडीओ लोंढे,विस्तार अधिकारी साळवे,सखाराम दिवटे,तुळशिराम पोतदार यांचे सततचे पैसे मागणीच्या ञासाला वैतागलो आहे.त्यांची आर्थिक मागणी मी पुर्ण करू शकत नाही.माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला आत्महत्या केल्या शिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही.त्यामुळे मी औषध पिल्याचे सांगितले.नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथिल खाजगी रूग्णालयात दाखले केले होते.उपचारादरम्यान दि.२१ जानेवारी गुरूवार रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्याण त्यांचे निधन झाले.असे दिलेल्या फिर्यादीत पत्नि प्रतिबा संजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असुन माझे पती संजय शिंदे यांना मानसिक ञास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गट विकास अधिकारी विजय लोंढे,विस्तार अधिकारी भास्कर साळवे,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सखाराम दिवटे,ग्रामसेवक तुळशिराम पोतदार यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स.पो.नि.पंकज उदावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील,सुधाकर चाव्हाण,जमादार सतिष बोडले,शेषराव नाडे हे करित आहेत. मयत संजय शिंदे यांच्यावर औरंगाबाद घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर राञी उशिरा जोगेश्वरी वाडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदर गटविकास अधिकारी हे वर्धा जिल्हयात पंचायत समिती समुद्रपूर येथे कार्यरत असतांना तेथील ग्रामसेवक बुध्ददेव म्हस्के यांनी सुद्धा आत्महत्या केली होती.
त्यात गटविकास अधिकारी आरोपी असलेले लोंढे यांची चौकशी चालु आहे.सदर गटविकास अधिकारी यांना पैठण तालूक्यात १४ वा वित्त आयोगाच्या कामाचे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांच्या परवानगी शिवाय पैसे देण्यात येऊ नये असे बँकेला आदेश दिले आहेत.त्यामुळे प्रत्येक वेळी बँकेतुन पैसे काढण्याचे आदेश देण्यासाठी पैसे दिल्या शिवाय आदेश देत नाही.१५ वा विप्त आयोगाच्या आराखडयाला मंजुरी देण्यासाठी चौकशी मागणी करतात.सदर गटविकास अधिका – यांच्या दहशतीखाली तानतनावात सर्व ग्रामसेवक काम करीत आहेत.असे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.गटविकास अधिकारी विजय लोंढे हे पैठण पंचायत समितीला राहील्यास अशा घटना वारंवार घडतील त्यामुळे सदर गटविकास अधिकार – याचा पदभार काढून सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्यात यावी. संबधीत गटविकास अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी ग्रामसेवक संघटेने केली आहे.