Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पिंप्रीराजात चोरट्याने शेतकऱ्याच्या टेम्पोतून शेळ्या चोरी पिंप्रीराजा परिसरातील शेतकऱ्यांत खळबळ

MH20LIVE.COM

करमाड : पिंप्रीराजा (ता. औरंगाबाद) येथून अज्ञात चोरट्यानी गुरुवारी सकाळी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान पिंप्रीराजा-चित्तेपिंपळगाव मार्गावरील एका शेतकऱ्याच्या दीड लाखाच्या ७५ लहान व मोठ्या शेळ्या टेम्पोमध्ये टाकून चोरून नेल्याने पिंप्रीराजा परिसरातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.
पिंप्रीराजा-चित्तेपिंपळगाव येथे शेतकरी बुधवारी (दि.२४)रोजी सायंकाळी ७ वाजता बकऱ्यांना चारा-पाणी करून आम्ही रात्री ९ वाजेदरम्यान कुटूंबियासह झोपलो होतो. गुरुवारी सकाळी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान गॉटफॉर्ममध्ये असलेल्या शेळ्यांनी एकच गोंगाट सुरू केला. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मी बॅटरी घेऊन बाहेर आलो. त्यावेळी चोरट्यांचे दोन पिकअप टेम्पो उभे होते. तसेच यापूर्वी मी माझ्या दोन शेळ्या वाजेद अन्सार कुरेशी (रा. चिकलठाणा, औरंगाबाद) याला विकल्या होत्या. तोही शेळ्या चोरतेवेळी याठिकाणी हजर होता. यावेळी मी वाजेद याला आवाज दिला असता, तो थांबला नाही. तो इतर साथीदारांसोबत फरार झाला. त्यानंतर चोरट्यानी शेळ्या भरलेला टेम्पो भरधाव वेगाने कारखाना रोड व चित्तेपिंपळगाव रोडकडे पळविला. मी त्यांचा पाठलाग केला. परंतु चोरटे पसार झाले. पिंप्रीराजा (ता. औरंगाबाद) येथून अज्ञात चोरट्यानी गुरुवारी सकाळी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान पिंप्रीराजा-चित्तेपिंपळगाव मार्गावरील एका शेतकऱ्याच्या दीड लाखाच्या ७५ लहान व मोठ्या शेळ्या टेम्पोमध्ये टाकून चोरून नेल्याने पिंप्रीराजा परिसरातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून वाजेद कुरैशी यास ताब्यात घेतले. तसेच या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश जागडे यांनी सांगितले. फिर्यादी दत्ता घोरपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close