Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ

सातारा-देवळाई भागात आमदार संजय शिरसाट यांनी एमजीपी व सां.बा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

संभाजीनगर (ता.14) : आमदार संजय शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नातुन पश्चिम मतदार संघामध्ये 25 कोटी व 15 कोटींची कामे राज्य शासनाकडून रस्ते, ड्रेनेज लाईनच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता सातारा-देवळाईकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे.

संभाजीनगर शहरासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. आता संभाजीनगर शहरासाठी प्रस्तावित पाणी योजना मंजूर झाल्यामुळे शहरवासीयांचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या 15 कोटींची रस्त्याची कामे सुरू करण्याआधी त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत सुधाकरनगर, अहिल्याबाई होळकर चौक, संभाजी चौक, म्हाडा कॉलनी, आयप्पा मंदिर, अरुणोदय कॉलनी, अलोकनगर या सातारा-देवळाई परिसरात रस्ते, पाण्याची पाईप लाईन व टाकीची पाहणी केली आहे.

सातारा-देवळाई हा परिसर प्रामुख्याने मोठ्या लोक संख्येने वाढत आहे, त्यामुळे याठिकाणी कुठलेही पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते,
त्यामुळे याभागात संपूर्ण नवीन पाईप लाईन टाकण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना करावी लागणारी भटकंती होणार नाही असे आमदार शिरसाट म्हणाले.

सुधाकर नगर, म्हाडा कॉलनी, सातारा, देवळाई, हरिओमनगर, आमेर नगर, एजीपी स्कुल, वीटखेडा अशा ठिकाणी 8 मोठे जलकुंभ बांधण्यात येणार आहे तसेच विना मोटर 12 मीटर पर्यंत पाणी 4 मजल्यावर पोहचू शकेल असे देखील आमदार संजय शिरसाट यांना एमजीपीचे शाखाअभियंता बाळासाहेब सदावर्ते यांनी पाहणी दरम्यान सांगितले.

तसेच सातारा देवळाई या भागामध्ये येत्या काही दिवसात 15 कोटीचे सिमेंट रस्त्याची कामे सुरू करण्यात येणार आहे, या रस्त्याची कामे सुरू करण्याआधी मंजूर झालेली पाणी योजनांमध्ये काही रस्ते येत असल्यामुळे रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा तो रस्ता खोदावे लागू नये म्हणून आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याचे पाईप लाईनचे कामे त्वरीत करण्याचे आदेश दिले. तसेच या विभागाशी संबंधित अधिकारी यांनी ही पाईप लाईनचे काम येत्या 2 दिवसांत सुरू करण्यात येईल असे सांगितले. ही पाईप लाईनचे कामे झाल्यावर लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे सा.बा.विभागाचे उपकार्यकारी अभियंता येरेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी सा.बा. उपअभियंता येरेकर, एमजीपीजे उपअभियंता किरण पाटील, शशिकांत ढवळे, शाखा अभियंता बाबासाहेब सदावर्ते, आदिनाथ शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रणजित ढेपे, शिवा हिवाळे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, संतोष जाटवे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, गजू शिंदे, भाऊसाहेब शिंदे, संदीप कोसडीकर, रवी ढगे, संजीवन सरोदे, दिनेशराजे भोसले, किशोर साबळे, बाळू मिसाळ, रामेश्वर शिंदे, ईश्वर पारखे आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close