Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

ओलं खोबरं खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे , जाणून घ्या फायदे !

ओलं खोबरं खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे , जाणून घ्या फायदे !

ओलं खोबरं खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे , जाणून घ्या फायदे !
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं ते काही खोटं नाही. या झाडापासून ते त्याच्या फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो. खासकरुन शहाळं आणि नारळ यांचा सर्वाधिक फायदा होतो.

अनेक जण रोजच्या आहारात ओल्या किंवा सुक्या नारळाचा आवर्जुन वापर करतात. मात्र काहींना नारळ किंवा ओलं खोबरं फारसं आवडत नाही. त्यामुळे अनेक जण ते खाण्याचं टाळतात. मात्र ओल्या खोबऱ्याचे हे फायदे पाहिले तर नक्कीच प्रत्येक जण आहारात ओल्या खोबऱ्याचा समावेश करेल.

ओलं खोबरं खाण्याचे फायदे

१. घसा खवखवून खोकला येत असल्यास ओला नारळ चघळून खावा किंवा घसा सतत कोरडा पडत असेल तर ओल्या नारळाचा कीस आणि साखर खावी.

2 नारळाचे तेल केस वाढविते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करते, त्वचेचा कोरडेपणा घालवते. त्यामुळे अनेक त्वचाविकारात बाहेरून लावायला उपयोगी.

3 अंगाची आग होत असल्यास किंवा रक्तातून रक्त पडत असल्याचं ओलं खोबरं, काळ्या मनुका आणि खडीसाखर एकत्र करुन खावं.

4. केस वाढीसाठी नारळाचं तेल, नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. केस गळत असल्यास नारळाच्या तेलाने किंवा दुधाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश का.

5 अशक्त व्यक्ती असल्यास त्यांनी खडीसाखरेसोबत खोबरं खावं. तसंच वजन वाढत नसेल तर गुळ आणि खोबरं एकत्र खावं.

6. पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.

७. नारळाची करवंटी उगाळून किंवा करवंटीतून निघणाऱ्या तेलाचा उपयोग खरूज, नायटा किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी केला जातो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close