Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कोरोनात डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांचे कार्य प्रशंनीय-डॉ. विजयकुमार फड

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com


औरंगाबाद/mh20Live Network कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करणे, त्यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी व त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, या कामी डॉक्टर व त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी हे उत्त्मप्रकारे काम करीत असल्याने त्यांचे कार्य प्रशंनिय आहे, असे मत डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले आहे.औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग रोखता येण्याच्या अनुषंगाने कार्य करीत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांच्या कामाची पहाणी करतांना फड यांनी शहरातील अनेक भागांना भेटी दिल्या. शहरात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन आदेशाचा अंमल योग्यप्रकारे होत आहे किंवा नाही.बाबतची प्रत्यक्ष पहाणी करतांना त्यांनी अनेक सी.सी.सी. केंद्र तसेच बाहेरुन शहरात येणा-या नागरिकांची अँटीजन तपासणी केली जात असलेल्या केंद्रांची पहाणी केली. नेमून दिलेल्या भागाती दवाखान्यातील तसेच सी.सी.सी. केंद्र व बाहेरुन शहरात येणा-या नागरिकांची अँटीजन तपासणी होत.असलेल्या केंद्रावरील डॉक्टर व नियुक्त कर्मचारी नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करीत त्यांचे कार्य.उत्तमप्रकारे पार पाडीत आहेत. अनेक प्रकारचे प्रश्न लोक मांडत असतांनाही त्यांना योग्यप्रकारे.समजावत व येत असलेल्या अडचणीवर मात करीत आपली भूमिका पार पाडणे तसे अवघड असतांनाही हे अवघड कार्य डॉक्टर चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याची बाब ही निश्चितच प्रशंसनीय असल्याचे फड यांनी म्हटले. झाल्टा फाटा, गोलेवाडी, संताजी नाका येथील अँटीजन तपासणी केंद्र, नक्षत्रवाडी,सिल्कमिल कॉलनी येथील आरोग्य केंद्र व छत्रपती शाहू महाराज मेडीकल कॉलेज येथे भेट देऊन फड यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. डॉ. नंदीनी
तिवारी यांनी रुग्णांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याच्या अनुषंगाने केले जात असलेले अनेक उपक्रम सांगीतले. सदर उपक्रम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे फड म्हणाले. या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख सर यांनी फड यांना या केंद्रावरील सविस्तर माहीती दिली. देशमुख सरांचे सहकार्य प्रशंसनिय असल्याचे फड म्हणाले. प्रत्येक रुग्णांस व संबंध येणा-या नागरिकांस समजून घेत व त्यांची मानसिकता योग्य प्रकारे सांभाळत मार्गदर्शन करीत त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य सर्व स्तरावर चांगल्याप्रकारे डॉक्टर व त्यांच्या सोबतचा कर्मचारी वर्ग पार पाडत आहे. कांही डॉक्टर व कर्मचारी अनेक दिवस घरीही जात नाहीत. केवळ कोरोनाशी संबंधित काम, एवढेच धेय्य विचारात घेऊन कार्य करीत आहेत. ही सर्व मंडळी आपल्यासाठी काम करीत असल्याने आपण नागरिकांनी, रुग्णांनी त्यांना योग्य ते सहकार्य केले पाहीजे. डॉ फड यांना कांही ठिकाणी काही कर्मचारी, अधिकारी यांनी प्रत्यक्ष काम करतांना येत असलेल्या काही अडचणी सांगीतल्या. त्यावर मार्गदर्शन करुन फड यांनी कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मार्ग काढत आपणास हे कार्य अंतिम टप्प्यापर्यंत करावेच लागेल असे म्हटले. उपस्तिथांनी फड यांना आम्ही या कामात अजिबात मागे पडणार नाही अशी ग्वाही दिली. फड यांचे समवेत डॉ. डिम्पल परदेशी, डॉ. अर्चना गादीया, उपायुक्त संतोश ठेंगले, पोलिस निरिक्षक सुरेंद्र माळाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल क-हाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी माधव किरवले व अन्य अधिकारी होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close