Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद शाखेचे कार्य इतिहासात नोंदविले जाईल – संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांचे गौरवोद्गार


औरंगाबादः कोरोना महामारी सुरु झाल्यापासून भारतीय जैन संघटनेने जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण टीमने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन आणि मिशन झिरो या प्रकल्पामध्ये झोकून दिले. आजही त्यांचे काम आजही न थांबता सुरुच आहे. संपूर्ण मानवजातीवर आलेले संकट कमी करण्यास नक्कीच औरंगाबाद शाखेचे योगदान आहे. या संपूर्ण टीमच्या कार्याची नोंद इतिहासात निश्चितच घेतली जाईल, असे गौरवोद्गगार संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित  नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० या व्हर्च्युल सोहळ्यात बोलत होते.
ते म्हणाले, की औरंगाबाद शाखेने १२८ दिवसांत न थांबता न हारता ७४ हजार अँटीजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या. या चाचण्यांतून चार हजार ६०० कोरोना सकारात्मक रुग्ण शोधले. त्यामुळे कोरोना महामारी आटोक्यात आणण्यास व मृत्यूदर रोखण्यास मदत झाली. त्याशिवाय स्मार्ट हेल्मेटद्वारे ५०हजार २०० लोकांच्या चाचण्या करून त्यातून १९५ कोरोना रुग्ण शोधून दिले. सिरो सर्वेक्षणात साडेचार हजार लोकांचे नमुने घेतले होते. येत्या काळात औरंगाबाद शाखेचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल.
किशोर ललवाणी यांचा सन्मान
पुरस्कार सोहळ्यात कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत भारतीय जैन संघटनेच्या मुख्य शाखेने जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांचा आऊटस्टँडींग कॉन्ट्रीब्यूशन २०१९-२० पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर ३५ वर्षाच्या निरंतर सेवेकरिता गौतम संचेती यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेकरिता पारस चोरडिया, प्रकाश कोचेटा, अमित काला, प्रविण पारख, अनिल संचेती, राहुल झांबड आणि अभिजीत हिरप आदी परिश्रम घेत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close