Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव उतरलंय आंदोलनात:साष्टपिंपळगाववासीयांचा आत्मदहनाचा इशारा

सातव्या दिवशी आंदोलन तीव्र, मराठा आरक्षणासाठी


अंबड :मराठा आरक्षणावर राज्य, केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत असल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे.

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

पहिले सात दिवस समाजबांधवांनी आंदोलन केले. परंतु, अजूनही यावर निर्णय घेतला जात नसल्यामुळे बुधवारपासून आता गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. कुणीच अन्न घेत नसल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न आणखीच तीव्र होत चालला आहे. आरक्षण देण्यासाठी आता सरकारला गावातच यावे लागेल, नसता या ठिकाणीच नंतर आत्मदहनाचे पाऊल उचलणार असल्याचे गावकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले

हेही वाचा: औरंगाबाद तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाचीउद्या सोडत

.शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी शिक्षण न घेण्याचाही ठराव घेतला आहे. चांगले गुण असूनही नोकरी मिळत नाही, हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असतानाही फीस भरून शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे साष्टपिंपळगावातील ग्रामस्थ अजूनच आक्रमक होत चालले आहेत. गेल्या आठवड्यापासून ग्रामस्थ शेतातील कामे न करता उपोषणाला बसून आहेत. ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विविध गावांतून समाजबांधव येत आहेत.या आंदोलनामुळे गाव अचानक राज्यात चर्चेत आले. प्रस्तावित कृषी कायदे रद्द करण्यासाठी ज्या प्रमाणे शेतकरी दीर्घ आंदोलनाला बसले आहेत. त्यापासून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांची एकजूट असल्याने आंदोलनाने जोर धरला. त्यामुळेच साष्टपिंपळगाव या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले. शिवाय गावात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. पण असे असले तरी इतर समाजाच्या नागरिकांनीही याला पाठिंबा दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close