Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

हॉटेल कामकरणाऱ्या दुचाकी खड्यात जाऊन घटनास्थळी अपघात, दुचाकीस्वार 2 ठार


पाचोड : मातोश्री हॉटेल रोहिलागड (ता.अंबड) येथून आपले दैनंदिन काम आटपून घराकडे जात असताना दाभरूळच्या दिशेने जाताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेच्या  खड्यात आदळून  दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार पुरुष व महिला जागीच ठार झाल्याची घटना पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत  दि.२२ शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अनिस गफूर पठाण (वय ४५) रा. बीड ह मु. आपतगाव (ता.औरंगाबाद) , व संगीता दळवे (वय ४५) रा. इस्लामपूरा बीड हे जागीच ठार झाले. रस्त्याच्या वाकणाचा अंदाज न आल्याने गाडीसह रस्त्याच्या खाली जाऊन ही घटना घडली तर सकाळी ९ वाजता ही घटना उगडकिस आली. मयत हे  हॉटेल मध्ये काम करत होते. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस जालना ऋषिंद्र राऊत, दिनकर मोरे, तान्हाजी कान्होरे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती जाणून घेतली. घटना स्थळी पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, बीट जमादार गोरखनाथ कणसे, चालक काकडे, अफरोश पठाण  हे घटना स्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मयताना पाचोड ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेम करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पाचोड पोलिसांनी दिली आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close