Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

“बायकोला हवं तरी काय” या नव्या कोऱ्या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित


अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा प्रियदर्शन जाधव हा “बायकोला हवं तरी काय” या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची भूमिका निभावत आहे. तसेच श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी हे प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
एका पत्नीला आपल्या पतीमध्ये काय हवं असत? रुबाबदार दिसणारा अभिनेता, सिंघम सारखा पोलीस अधिकारी, शांतता प्रिय अध्यात्मिक गुरू किंवा दबदबाअसणाऱ्या राजकारण्यासारखा कोणीतरी. आणि मग अशा अनेक गगनउंची गाठलेल्या अपेक्षांसह, प्रत्येक पत्नीला असे वाटते की देवाने तिच्याच पती मध्ये हेसर्व गुण का नाही दिले.
अशीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल “बायकोला हवं तरी काय” ही एक विनोद आणि मनोरंजनाने परिपूर्ण वेबसिरीज प्रेक्षकांसाठीघेऊन येत आहे. एक सामान्य गृहिणी (श्रेया बुगडे) आपल्या भक्तीने श्रीकृष्णाला (निखिल रत्नपारखी) प्रसन्न करते आणि त्या बदल्यात परमेश्वराकडे तिच्यानवऱ्याला, तिच्या नजरेतल्या सर्वोत्कृष्ट जीवनसाथीच्या प्रतिमेनुसार अपग्रेड करायची मागणी करते हे वेबसिरीजच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतंय.
प्रियदर्शन जाधव याने या ६ भागांच्या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून तो वेबसिरीज बद्दल सांगताना म्हणाला, ” प्रत्येकाला आयुष्यात आपणअपग्रेड व्हायला हवं असं नेहमीच वाटत. नवीन गाडी मध्ये अपग्रेड करावा अस वाटत, मोठ घर घेऊन अपग्रेड व्हावं अस वाटत… पण काय होतं जेव्हा आपणआपल्या साथीदाराला “अपग्रेड” करायला जातो? या कथेतून हाच हास्यवर्धक, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसहगोड संदेश देत आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सिरीज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल.
श्रेया बुगडे पुढे म्हणाली, “माझे पात्र एका साध्या गृहिणीचे आहे जिला आपल्या पतीसाठी आणि स्वतःसाठी सर्वात चांगल अस सगळं हवं असण्याची इच्छाआहे. मी सीरिज बद्दल एवढेच सांगू शकते की प्रत्येक वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणतात तेव्हा नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील आणि मी याचीहमी देते की या सर्व गोष्टींच्या शेवटी स्वतः भगवान श्री कृष्णाला ही प्रश्न पडेल नक्की ‘बायकोला हवं तरी काय’.
एमएक्स प्लेयरने अनेक वेगवेगळ्या विषयांच्या कलाकृतीचा नजराणा देत, समांतर, आणि काय हवं, पांडू आणि इडियट बॉक्स सारख्या बहु-शैलीतील मराठीवेब सीरिजद्वारे प्रेक्षकांना आजवर आकर्षित केले आहे. “बायकोला हवं तरी काय” या नवीन सिरीजच्या स्वरूपात हास्य आणि मनोरंजनाची पर्वणी सुरू होतेय ४डिसेंबर पासून एम एक्स प्लेयर वर. या सिरीजचे सर्व भाग विनामूल्य पाहता येणार आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close