Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांची सुरक्षा खूप महत्त्वाची:कमलेश कटारीया


सिल्लोड/mh20live network

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरात आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे शहर कोषाध्यक्ष प्रकाश भोजवानी यांच्या वतीने पोलीस बांधवांना स्पेशल फेस प्रोटेक्शन शिल्ड मास्क चे वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना कमलेश कटारीया म्हणाले की “जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांची सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे. कोरोना सदृश परिस्थितीत ह्या मास्कचा वापर उत्तम रित्या सुरक्षा कवच म्हणून करता येईल.” कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात शहर संघचालक शामकुमार भोजवानी, उपजिल्हाध्यक्ष विलास पाटील, मनोज मोरेल्लू, शामराव आळणे, अरुण राठोड, प्रशांत चिनके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहर उपाध्यक्ष अमोल ढाकरे, नंदकुमार श्रीवास्तव, मधुकर जाधव,कैलास बाविस्कर, दिलीप पैठणकर, ईश्वर कुंटे, अमोल कारले यांच्या हस्ते पोलीस बांधवांना शिल्ड मास्क प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन अमोल शेजुळ यांनी केले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close