Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

औरंगाबाद तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण निघाले आता खरी कसोटी राजकिय पक्षाची


शरणापुर, पंढरपुर, तिसगाव या ग्रामपंचायतीवर महिला राज पहायला मिळणार

करमाड:सुदाम पठाडे
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवण्यात येवुन इतर प्रवर्गासाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे शुक्रवारी (दि.29) आरक्षण कायम करण्यात आले.आरक्षण पदासाठी वापरण्यात आलेली प्रक्रिया जुनीच असुन नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने चिठठया काढण्यात आल्या. त्यामुळे महिलांच्या जागी पुरूष किंवा पुरूषांच्या जागी महिला असा पाच दहा टक्के बदल आढळुन आला.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण

औरंगाबाद तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या शरणापुर,पंढरपुर,तिसगाव या मोठया ग्रामपंचायतीवर आता महिला राज पहायला मिळणार आहे.स्थानिक आघाडया ज्यांच्याकडे आहेत तोच राजकिय पक्ष आता सत्तेजवळ जाणार आहे.सरपंच पदाच्या निवडण्ुकित सर्वच राजकिय पक्षांची आता खरी कसोटी लागणार असुन कुठल्या राजकिय पक्षाकडे किती ग्रामपंचायती जातात हे स्पष्ट होणार अाहे बहुतेक ग्रामपंचायतीचे सदस्य सहलीवर गेले असुन उर्वरीत सदस्य गोपनिय स्थळी जाण्याच्या तयारीत आहेत सर्वांचे डोळे आता सरपंच पद निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे.


हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा
औरंगाबाद तालुक्यात एकुण 114 ग्रामपंचायती आहेत.या सर्व ग्रामपंचायतीचे शुक्रवारी (दि.29) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेल्या सोडतीपैकी अनुसुचीत जाती व अनुसुचित जमातीचे तेवीस जागेचे आरक्षण कायम ठेवण्यात येवुन उर्वरीत 91 जागेसाठी नव्याने प्रक्रिया राबवुन आरक्षण कायम करण्यात आले.प्रतिक्षा साईनाथ पचलोरे या बालिकेच्या हस्ते डब्यामधुन सर्वसमक्ष चिठठया काढण्यात आल्या.समोरचा हॉल खचाखच भरलेला होता.तर व्यासपिठावर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसीलदार शंकर लाड,नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे,रेवनाथ ताठे,सचिन वाघ आदींची उपस्थिती होती.


हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण


अनुसुचित जातीसाठी वीसव अनुसुचित जमातीस तीन अशा एकुण तेवीस जागेसाठी आठ डिसेंबर 2020 रोजी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आलेले आहे.उर्वरीत 91 जागेसाठी काढण्यात आलेले आरक्षण खालीलप्रमाणे

हेही वाचा जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
जटवाडा,गोलटगाव,गारखेडा,वंजारवाडी,लिंगदरी,वळदगाव,वडगाव कोल्हाटी,पिंपळखुटटा,टोणगाव,कुंभेफळ,ओव्हर, मंगरूळ,पंाढरी पिंपळगाव,चिंचोली,झाल्टा.

नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)
शरणापुर,आडगाव सरक,शेंद्राबन,गिरनेरा,खेाडेगाव,सांजखेडा,माळीवाडा,देमणी, पाचोड,निपाणी,पंढरपुर,गोलवाडी, नायगव्हाण,भिंदोन,भालगाव, तिसगाव.

सर्वसाधारण(तीस जागा)
घारदोन,वरझडी,दौलताबाद,करमाड,भांबर्डा,पोखरी,मांडकी,कोनवाडी,सिंदोन,महालपिंप्री,वरूड,वडखा,गेवराई कुबेर, सताळा ,कोळघर,सावंगी,डायगव्हाण,पिंपळगाव पांढरी,मोरहिरा,शिवगड तांडा,घारेगाव एकतुणी,आब्दीमंडी,पिसादेवी,कौडगाव जालना , आडगाव माहोली,अंजनडोह,वाहेगाव ,परदरी,काद्राबाद,गांधेली.

सर्वसाधारण -महिला राखीव(30 जागा)
शेलुद,चारठा,मुरूमखेडा,चित्ते पिंपळगाव,पिरवाडी,लायगाव,जडगाव,सटाणा,खामखेडा,एकोड,गेवराई बु्कबाँड,बनगाव,का-होळ,शेवगा,लाडगाव,दुधड,रावसपुरा,चितेगाव,जळगाव फेरण,शेंद्रा कमंगर,राहाळपटटी तांडा,गाडे जळगाव,शेकटा,ढवळापुरी ,करोडी,जोडवाडी,पिंप्री खु ,बाळापुर,घारेगाव पिंप्री,कृष्णपुरवाडी.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close