Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

“अटल आनंदवन घन वन” प्रकल्प जणू देवस्थानाची निर्मितीच :प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.जीत सिंग

अलिबाग,जि.रायगड दि.01 :- स्वच्छ वातावरण, प्रदूषणमुक्त हवामान, श्वासोच्छवासासाठी शुध्द हवा ही मानवी जीवनासाठी काळाजी गरज झाली आहे. त्यासाठी “मियावाकी” या जपानी संकल्पनेतील जंगल म्हणजेच ‘घन वन प्रकल्प” हा रामबाण उपाय आहे. शासनाची “अटल आनंद वन घन वन” प्रकल्प ही योजना म्हणजे जणू देवस्थानाचीच निर्मिती असल्याचे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.जीत सिंग (भारतीय वन सेवा)  यांनी आज येथे केले.

            सामाजिक वनीकरण कोकण वनवृत्त, ठाणे वन विभाग, महाराष्ट्र शासन निर्मित व सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी श्री.अप्पासाहेब निकत लिखित “अटल आनंदवन घन वन” या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी ते बोलत होते.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण ठाणे विभागाच्या वनसंरक्षक श्रीमती जयोती बॅनर्जी (भारतीय वन सेवा), तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी अप्पासाहेब निकत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक वन संरक्षक आर.एम. म्हात्रे हे उपस्थित होते.

श्री.जीत सिंग पुढे म्हणाले की, औद्योगिकरणामुळे वनक्षेत्र कमी झाले. जागेची उपलब्धता कमी होऊ लागली. प्रदूषण वाढले. झाडांची-वृक्षांची संख्या कमी होऊ लागली. या सर्व समस्यांवर मात करून मानवी जीवनाला वाचविण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे होते. “अटल आनंदवन घन वन प्रकल्प” ही योजना सर्वांसाठी जणू संजीवनीच ठरली आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व त्यातून घन वनाची निर्मिती ही अत्यंत स्वस्त, यशस्वी ठरलेली संकल्पना आहे.  स्थानिक जैविक संसाधने टिकविणे, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

कोकण निसर्गतः झाडाझुडपांनी समृध्द आहे. तरीही येथील वाडींमध्ये काही जागेत अशा प्रकारचे घन वन किंवा “वनौषधी घन वन” निर्मिती केल्यास त्याचा लाभ जनतेला होऊ शकतो व  “कोकण आनंदवन अटल  घन वन” किंवा “कोकण वनौषधी अटल घन वन” पॅटर्न तयार होऊ शकेल. या दृष्टीने येथील जनतेला आवाहन करण्यात येऊन प्रोत्साहन देण्यात यावे, असेही त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुचविले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्ष पूजनाने झाली. प्रास्ताविक मुख्य लेखापाल आर.एम. भोसले यांनी केले. त्यानंतर विभागीय वनाधिकारी अप्पासाहेब निकम यांनी “अटल आनंदवन घन वन” या पुस्तकाबाबतची संकल्पना व निर्मिती विषद केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “अटल आनंदवन घन वन” या प्रकल्पातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील कामाबाबतची लघुचित्रफीत दाखविण्यात आली. तसेच “अटल आनंदवन घन वन” पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी वनसंरक्षक श्रीमती जयोती बॅनर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “अटल आनंदवन घन वन” संकल्पना सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून व श्रमदानातून  कशा प्रकारे यशस्वी करण्यात आली, याचे अनुभव उपस्थितांना कथन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सामाजिक वनीकरण अलिबाग परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल सौ.जी.जी.पाटील यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close