Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

खांदा कॉलनीतील रुग्णाला मिळवून दिली 2 लाखाची बिलात सवलत कांतीलाल कडू यांनी कोविड सेवेचा यज्ञ केला अधिक प्रज्वलित


पनवेल: नेरूळ नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार घेत असलेल्या खांदा कॉलनी येथील रुग्णाला सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी बिलात तब्बल 2 लाखाची सवलत मिळवून देत कोविड सेवेचा यज्ञ अधिक प्रज्वलित केला आहे.
खांदा कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानराज शेगेकर यांनी मुरुड येथील मुळ रहिवाशी असलेले आणि सध्या खांदा कॉलनीत राहत असलेल्या मित्राला अपोलो हॉस्पिटलला अड्मिट केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना दिली. 52 वर्षीय रुग्णाची प्रकृती अद्याप बरी होत नसून हॉस्पिटलचे बिल 12 लाखांवर गेले आहे. त्यांना अलिबाग येथील सामान्य हॉस्पिटलला हलविण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र, बिलाच्या रकमेत काही सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती शेगेकर यांनी कडू यांना केली होती.
त्यानुसार कडू यांनी तातडीने नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजता ढोले, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. किरण शिंगोटे यांना विनंती केल्यानंतर त्यांनी रुग्णाच्या बिलात सवलत देत 2 लाख रुपये कमी करून रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. त्या नंतर रुग्णाला तातडीने अलिबाग येथील सरकारी हॉस्पिटलला हलविण्यात आले.
शेगेकर यांनी कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधून ही माहिती देत त्यांना धन्यवाद दिले आहेत.
गेल्या काही महिन्यात कोविडचा कहर आणि रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोविड रुग्ण दाखल करणे, त्यांना खासगी हॉस्पिटलला बिलात सवलत मिळवून देण्याचे अजोड कार्य कांतीलाल कडू यांनी सुरूच ठेवले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close