Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

सूर जुळला जोडीचा

सूर जुळला जोडीचा

कलेचा प्रांत हा मुळातच एकमेकांच्या सहकार्यावर, मैत्रीवर अवलंबून असणारा. पडद्यामागचे असे अनेक मैत्र पडद्यावरच्या सृजनात्मक अविष्काराला कारणीभूत ठरत असतात. कलेच्या प्रांतात अशा अनेक जोड्या जमलेल्या दिसतात. सुरुवातीला मित्र, मार्गदर्शक, सहकारी म्हणून धरलेला हात पुढे नकळत नाजूक अशा रेशीमबंधात बांधला जातो. विचारांसोबतच मनाच्या ही तारा जुळू लागतात तेव्हा एकमेकांच्या सहकार्यातून एक अनोख्या कलाकृतीचा अविष्कार होत असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशाच एका जोडीच्या संगतीने म्हणजेच दिग्दर्शक योगेश जाधव आणि लेखिका भक्ती जाधव यांचे व्यक्तिगत आयुष्यात जुळलेले प्रेमाचे सूर आता इमेल फिमेल या मराठी चित्रपटासाठी सुद्धा जुळलेले पहायला मिळत आहेत. ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत इमेल फिमेल येत्या २६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश यांनी सांभाळली असून चित्रपटाची पटकथा व संवादाची जबाबदारी भक्ती यांनी सांभाळली आहे. शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेत योगेश आणि भक्तीला साथ दिली आहे. आमच्या मधुर नात्यातील केमिस्ट्रीचा प्रत्यय पडद्यावर साकारलेल्या कलाकृतीतून ही येईल असा विश्वास योगेश आणि भक्ती व्यक्त करतात.

आजच्या आधुनिक युगात ‘सोशल मीडिया’ हा समाज व्यवहारातला परवलीचा शब्द झालेला आहे. सोशल माध्यमाचा वापर करणाऱ्यांची संख्या सध्या कमालीची वाढलेली आहे. ही चांगली बाब असली तरी तशीच वर्तमान परिस्थितीत ती काळजी वाढविणारी चिंताजनक बाब ठरू लागली आहे. त्यामुळे या विषयावर व्यक्त होत नात्यातील भावभावनांचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न इमेल फिमेल चित्रपटातून करण्यात आला आहे.

निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या इमेल फिमेल चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन राजेश राव यांचे आहे. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, सीमा देसाई तर वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.

२६ फेब्रुवारीला इमेल फिमेल प्रदर्शित होणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close