Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय; ‘या’ जिल्ह्यात संचारबंदीची घोषणा

वाशिम, 20 : राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत आटोक्यात असलेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वाशिममध्ये आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

संचारबंदीत रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोलपंप व ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व दुकाने व आस्थापना सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार, गुरांचे बाजारदेखील बंद करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठीही पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close