Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

सामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या दृष्टिकोनावर आधारित नवीन मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्‍से’

सुरू होत आहे ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर

भारतीय टेलिव्हिजनच्‍या इतिहासामधील अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आल्‍या आहेत. पण, काहीच मालिकांना दिग्‍गजतेचा दर्जा मिळाला आहे आणि लोक आजही आवडीने त्‍या मालिकांची आठवण काढतात. अशीच एक मालिका आहे ‘वागले की दुनिया’. या मालिकेमधील आपलेसे वाटणारे कथानक आणि सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आलेल्‍या पात्रांनी देशाला एका सामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या साध्‍यासोप्‍या कथेच्‍या प्रेमात पडण्‍यास भाग पाडले होते. या आरके लक्ष्‍मणच्‍या कथेला आता नवीन स्‍वरूप मिळणार आहे, कारण सोनी सब सादर करत आहे ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ ८ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता.

भारताला हसवून-हसवून लोटपोट केलेल्‍या मालिकेची मूल्ये व प्रेमळ आठवणींना उजाळा देत सोनी सब माजी प्रशंसित वागले जोडी अंजन श्रीवास्‍तव ऊर्फ श्रीनिवास वागले आणि भारती आचरेकर ऊर्फ राधिका वागले या जुन्‍या पिढीला सादर करत आहे. कथा तेथूनच पुढे सरकवण्‍यात आली आहे आणि वागले व कुटुंबाच्‍या नवीन पिढीसह आजच्‍या काळात सादर करण्यात येत आहे. ‘वागले की दुनिया’च्‍या नवीन युगामध्‍ये श्रीनिवासचा मुलगा राजेश वागले या प्रमुख भूमिकेत सुमीत राघवन आणि त्‍याची पत्‍नी वंदना वागलेच्‍या भूमिकेत परिवा प्रणती आहे. दररोज नवीन आठवणी निर्माण करणारी मालिका ‘वागले की दुनिया’ राजेश वागलेच्या तो दररोज सामना करत असलेल्‍या समस्‍या व घटनांबाबतच्या दृष्टिकोनाला दाखवते. ज्‍यामुळे ही मालिका आजच्‍या प्रेक्षकांना आपलीशी वाटते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close