Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

नवीन बीएमडब्लू एक्स ६ भारतामध्‍ये 

mh20live.com

 बीएमडब्लू ग्रुप इंडियाने भारतामध्‍ये तिसरी जनरेशन बीएमडब्लू एक्स ६ सादर केली. नवीन बीएमडब्लू एक्स ६ मध्‍ये चपळता व वैविध्‍यपूर्ण ड्रायव्हिंग डायनॅमिक्‍ससह आकर्षक डिझाइनशैली, आकर्षक स्‍पोर्ट्स अॅक्टिव्‍हीटी कूपेची बहिमुखी वैशिष्‍ट्ये समाविष्‍ट आहेत. कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट्स म्‍हणून उपलब्‍ध असलेली नवीनबीएमडब्लू  एक्स ६ सर्व बीएमडब्लू डिलरशिप्‍समध्‍ये बुक करता येऊ शकते.

बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अॅक्टिंग प्रेसिडण्‍ट श्री. अरलिंदो टेक्‍सीएरा म्‍हणाले,” बीएमडब्लू ने बीएमडब्लू एक्स ६ च्‍या सादरीकरणासह एसएसी सेगमेंट स्‍थापित केला आणि आजही या विभागाची उल्‍लेखनीय यशोगाथा सुरू आहे. तिसरी जनरेशन बीएमडब्लू एक्स ६ ची अद्वितयता तिच्‍या आधुनिक आकर्षक डिझाइनमधून दिसून येते. यामध्‍ये अॅथलेटिक व आकर्षक कूपे लाइन्‍ससह बीएमडब्लू एक्स मॉडेलचे डायनॅमिझम समाविष्‍ट आहे. ही वेईकल इतरांपेक्षा अत्‍यंत वेगळी व वैशिष्‍ट्यांच्‍या संदर्भात अनोखी आहे. नवीन बीएमडब्लू एक्स ६ मध्‍ये लक्‍झरी, स्‍पोर्टींग डायनॅमिक्‍स व पॉवरफुल स्‍टाइलचे अद्वितीय संयोजन आहे, ज्‍यामधून आमच्‍या ग्राहकांना वेगळा उत्‍साहपूर्ण ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. कूपे सारख्‍या रूफलाइनपासून उत्तमरित्‍या परिभाषित प्रोफाइलपर्यंत या स्‍पोर्टी अॅक्टिव्‍हीटी कूपेमध्‍ये असाधारण कारागिरी समाविष्‍ट असून त्‍यामधून शक्‍ती व प्रतिष्‍ठेचा संदेश मिळतो. आकर्षक डिझाइन, प्रभावी डायनॅमिझम आणि चपळता ही वैशिष्‍ट्ये नवीन बीएमडब्लू एक्स ६ ला तिच्‍या सेगमेंटमध्‍ये सर्वात आकर्षक व वैशिष्‍ट्यपूर्ण बनवतात.”

नवीन बीएमडब्लू एक्स ६ पहिल्‍यांदाच ग्राहकांना कस्‍टमायझेबल पर्याय देते. पर्यायी फिचर्सच्‍या रेंजमध्‍ये बीएमडब्लू लेझर लाइट, बीएमडब्लू हेड-अप डिस्‍प्‍ले, कम्‍फर्ट अॅक्‍सेस, पॅनोरमा ग्‍लास रूफ स्‍काय लाऊंज, क्राफ्टेड क्‍लेरिटी ग्‍लास अॅप्‍लीकेशन आणि अॅम्बिएण्‍ट एअर पॅकेज समाविष्‍ट आहे. ग्राहक एंटरटेन्‍मेंटचा स्‍तर उंचावू शकतात आणि रिअर सीट एंटरटेन्‍मेंट प्रोफेशनल व हार्मन कार्डन सराऊंड साऊंड सिस्टिमच्‍या पर्यायांसह त्‍यांच्‍या प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. 21-इंच लाइट अलॉय व्‍हील्‍स, आकर्षक रंगकाम आणि ट्रिम ऑप्‍शन्‍स यासारखी अतिरिक्‍त वैशिष्‍ट्ये नवीन मॉडेलला अधिक आकर्षक बनवतात.

नवीन बीएमडब्लू एक्स ६ डायनॅमिक लाइफस्‍टाइलसह वैयक्तिक रूचीशी देखील सुलभपणे जुळवून घेते. ही कार दोन शक्तिशाली व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे – एक्स  लाइन आणि एम  स्‍पोर्ट. प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअर डिझाइन वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामधून कारला आकर्षक लुक मिळतो. xलाइन नवीन स्‍पोर्ट्स अॅक्टिव्‍हीटी कूपेच्‍या प्रबळ वैशिष्‍ट्यांना दाखवते आणि आकर्षक कॅरेक्‍टर कारचा ऑफ-रोड लुक अधिक वाढवते. एम स्‍पोर्ट आकर्षक डायनॅमिक डिझाइन रचना देते, ज्यामधूनप्रतिष्ठित स्‍पोर्ट्स मॉडेलप्रमाणे कारचा लुक व रचना दिसून येते.

स्‍टॅण्‍डर्ड व ऑप्‍शनल फिचर्सची व्‍यापक रेंज नवीन बीएमडब्लू एक्स ६ ला अपवादात्‍मक नाविन्‍यपूर्ण स्‍पोर्ट्स अॅक्टिव्‍हीटी कूपे म्‍हणून सादर करते. प्रगत पॉवरट्रेन व चेसिस टेक्‍नोलॉजीची परस्‍परक्रिया, तसेच अव्‍वल दर्जाचे इक्विपमेंट फिचर्स अद्वितीयरित्‍या स्‍पोर्टिंग, पण अत्‍यंत आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव देतात. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close