Subscribe to our Newsletter
मराठवाडा

महाराष्ट्रातील चळवळींना गती आणि दिशा देण्याचे काम माध्यमांनी केले- प्रा प्रदीप देशमुख

 मंठा / अनिल बा. खंदारे mh20live Network

समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम प्रसार माध्यमांच्या मार्फत होत असते, याच प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्रातील अनेक चळवळींना गती आणि दिशा दिल्याचा इतिहास आहे असे प्रतिपादन प्रा प्रदीप देशमुख यांनी केले. राज्य पत्रकार संघ ता. मंठाच्या वतीने सोमवार (ता 16 )रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित ” प्रसारमाध्यमांची सार्वजनिक कामातील पारदर्शकता आणि भूमिका ” या विषयावर आयोजित परिसंवादांमध्ये प्रा देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी, कार्याध्यक्ष अनिल बा खंदारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, रवी पाटील, पंडितराव बोराडे, अमोल राऊत, पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षा सौ मंजुषा काळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा प्रदीप देशमुख म्हणाले की, प्रसार माध्यमांची व्याप्ती फार मोठी आहे विचारांचा प्रसार करणारा प्रत्येक घटक म्हणजे माध्यम होय, माध्यमातून पेरलेले समाजातून उगवते आणि यातूनच समाजाची जडणघडण होत असते त्यामुळेच प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले आहे असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी, तुकाराम मुळे, अरुण राठोड, डॉ आशीष तिवारी, विजयकुमार देशमुख, रमेश देशपांडे, आसाराम शेळके, मोसिन कुरेशी, राघूसिंग जनकवार, प्रदीप पाटील, कैलास पवार , गौतम सदावर्ते, प्रकाश भावसार, किरण अवचार, राजू शिंदे, रितेश चंदेल यांची उपस्थिती होती. या परिसंवादाचा समारोप पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी यांनी केला तर आभार कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांनी मानले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close