Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा!: प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

औरंगाबाद : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद, कोल्हापूर या महापालिकांनी निवडणूक जवळ आली आहे. यासाठी सर्वच पक्ष आपली कंबर कस्त असून काँग्रेसने या दोन्ही महापालिकांमध्ये स्वबळाची नारा दिला आहे. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेसचे नेते व मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन स्वबळावर लढण्याची मागणी केली होती.

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देत महापौर काँग्रेसचाच बनवण्याची गर्जना केली. यामुळे त्यांनी थेट शिवसेनेलाच ललकारल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीच सत्ता औरंगाबादमध्ये आहे. महापौरपद देखील शिवसेनेकडे आहे. मात्र, आता थोरातांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडू शकते.

‘औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा’ असे आदेश बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षातील मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही.’ असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1344630113468436480/photo/2
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close