Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

आपत्तीचे महागुरू म्हणजेच खा.शरद पवार-प्रदीप सोळुंके


डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले

उस्मानाबाद/mh20live.com भारत देशावर कोणतीही आपत्ती असु द्या त्या आपत्तीचे व्यवस्थापन करणारे नेते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हेच आहेत व ते आपत्ती व्यवस्थापनाचे महागुरू असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलताना काढले. ते ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत खा.शरद पवार यांचे योगदान’ या विषयावर बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील  या बसल्या.मात्र त्यांचं नाव कशा पद्धतीने शरद पवार यांनी सुचवले व त्याला तत्कालीन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा होकार घेतला हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच खा. शरद पवार हे निवडणुकीचा काळ सोडला तर राजकारणावर फारशी चर्चा न करता समोरचा माणूस ज्या क्षेत्रातील आहे त्याच क्षेत्रातील माहिती ते घेण्याचा व देण्याचा प्रयत्न करतात.त्यांनी अनेक क्षेत्रांना स्पर्श केला आणि ती क्षेत्र प्रगतीपथावर गेली अशी अनेक उदाहरणं या व्याख्यानादरम्यान यांनी दिली.    कबड्डीच्या खेळाला मिळालेला मान-सन्मान पैसा असेल,आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटपटूंना व निवृत्त क्रिकेटपटूंना मिळालेले मानधन,पेन्शन असेल, कुस्ती लाल माती कडून मॅटवर नेण्याचं काम असेल या सर्व गोष्टी खा.शरद पवार यांनी केल्या व या खेळांना एक ग्लॅमर प्राप्त करून दिले.शेतीसंदर्भात तर त्यांचे नाव त्यांचे कट्टर विरोधकही घेतात 2009  साली 72 हजार कोटी रुपयांची केलेली कर्जमाफी यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठी मदत केली.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनीच मोठी कर्जमाफी केली असे सांगत 40 वर्षांपूर्वी भारत देश व महाराष्ट्राची अन्नधान्याची अवस्था बिकट होती मात्र खासदार शरद पवार हे कृषिमंत्री असताना त्यांनी भारत देशाला जगात अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम केले. 73 व्या घटनादुरुस्तीने 33 टक्के आरक्षण महिलांना मिळाले खरे मात्र त्याची अंमलबजावणी देशातील कोणत्याही राज्याने केली नव्हती ती अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे याचं श्रेय देखील शरद पवार यांनाच जातेशेवटी व्याख्यानाचा समारोप करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 21 वर्षात चार वेळा सत्तेवर आला असला तरी यामागे खासदार शरद पवार यांची ८० वर्षांची तपश्चर्या  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित केले आहे आणि या ठिकाणी नामांकित व्याख्यात्यांना आमंत्रित केले जात असल्याबद्दल त्यांनी डॉ.वेदप्रकाश पाटील सोशल फाउंडेशनचे अभिनंदन केले त्यासोबतच डॉ. प्रतापसिंह पाटील हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करणारे नेते आहेत असे गौरवोद्गारही त्यांनी या व्याख्यानादरम्यान काढले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close