Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

एचडीएफसी लाईफ तर्फे ऑफर -क्लिक २ प्रोटेक्ट लाईफ

एचडीएफसी लाईफ तर्फे नवीनतम ऑफर -क्लिक २ प्रोटेक्ट लाईफ  

ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीच्या  गरजा भागविण्यासाठी अनन्य वैशिष्ट्यांसह एक टर्म प्लॅन

* ६० वर्षांपासून लाईफ कवरसह  इनकम  प्लस पर्यायाच्या माध्यमातून नियमित इनकम

मुंबई –भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने त्यांचे नवीनतम फ्लॅगशिप टर्म प्रॉडक्ट क्लिक २ प्रोटेक्ट लाइफ लाँच केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भिन्न जीवनातील बदलत्या गरजा भागविण्यासाठी ही, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटिंग वैयक्तिक मुदत योजना तयार करण्यात आली  आहे.

वर्तमान काळातील कोरोना महामारीमुळे, एक उत्पादन श्रेणी म्हणून प्रत्येक व्यक्तीचा जीवन विमा कडे पाहण्याचा,  दृष्टिकोन बदलला आहे. मुदत विमा हा प्रत्येक आर्थिक योजनेचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

एचडीएफसी लाईफ द्वारे ऑफर  करण्यात आलेल्या  “क्लिक २ प्रोटेक्ट लाईफ” चे महत्वाचे पर्याय:-

१) जीवन आणि गंभीर आजार ऑटो-बॅलेन्स :- हे एक असे स्मार्ट कवर आहे जे गंभीर आजार (CI), ऑटो बॅलेंसिंग लाईफ द्वारे मृत्यू तसेच वाढत्या वयासह सीआय कवरच्या विरोधात सुरक्षितता प्रदान करते. या पर्यायामध्ये जीवन विमा कमी होते तर प्रत्येक एक वर्षांनी प्रमाणानुसार गंभीर आजारावरील कवर वाढत जाते. याव्यतिरिक्त सूचीबद्ध 36 सीआय अटींच्या कोणत्याही निदानावर, वाढीव सीआय विम्याची रक्कमच दिली जात नाही तर भविष्यातील सर्व प्रीमियमही माफ केले जाते तसेच लाईफ कवर देखील निरंतर सुरु राहते.

पॉलिसीच्या सुरूवातीला लाईफ कवर आणि क्रिटिकल इलनेस कवर यांच्यामध्ये ८०:२० या रेशोने  मूलभूत रकमेची विभागणी होते. संपूर्ण पॉलिसीमध्ये एकूण मूलभूत रक्कम समान असते.

या योजनेतील सर्वात चांगला भाग म्हणजे, प्रत्येक पॉलिसीच्या अँनिवर्सरीच्या वेळी वाढते सीआय कवर असूनही, पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत ग्राहकांचा प्रीमियम बदलत नाही.

२) जीवन सुरक्षा पर्याय:- हा पर्याय पॉलीसीच्या कालावधीच्या दरम्यान मृत्यू झाल्यास कवरेज प्रदान करत विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करते.विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला एक मोठी रक्कम प्रदान केली जाते. हे कवर निश्चित मुदतीसाठी किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी  घेतले जाऊ शकते.

३) इनकम  प्लस पर्याय :- हा पर्याय वयाच्या ६० वर्षापासून नियमित मासिक उत्पन्न प्रदान करते तसेच आश्रितांची  आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास कवर प्रदान करते. लाईफ अश्योर्ड हे संपूर्ण पॉलिसीच्या कालावधीसाठी कवर केले जाते,आणि वयाच्या ६० वर्षापासून मासिक उत्पन्न मिळणे सुरु होते, आणि मृत्यू होईपर्यंत किंवा पॉलिसी परिपक्व होई पर्यंत जे पहिले होईल तेच पुढे देखील चालू राहते.नॉमिनी असलेल्या व्यक्तीला,देय मृत्यू लाभ, मृत्यू पर्यंत भरलेल्या मासिक उत्पन्ना मध्ये कटौती केल्यानंतर मिळते. या योजनेत कोणतीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभरासाठी कवर च्या पर्यायाची निवड करू शकते.

जीवन विमा उद्योगात हा पर्याय एक अनोखा प्रस्ताव आहे, कारण हा पर्याय लाईफ कवरसह नियमित पेंशन देखील प्रदान करते.

सर्व पर्यायांमध्ये निश्चित आणि लाइफ कवर दोन्ही समाविष्ट आहे.

 प्री-डिस्क्लोज्ड अटींनुसार, काही पर्यायांसाठी रिटर्न-ऑन प्रीमियम, सीआय वर  प्रीमियमची सूट, अपघाती मृत्यू लाभ आणि प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सी बदल सारख्या सुविधांचा समावेश आहे.

या लाँच बद्दल बोलतांना श्रीनिवासन पार्थसारथी – चीफ एक्चुअरी आणि अपॉइंटेड एक्चुअरी म्हणाले कि,“जागतिक महामारीने प्रत्येक व्यक्तीस आर्थिक संरक्षणाची आवश्यकता असल्याची जाणीव करून दिली आहे.काळ आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आर्थिक संरक्षणाची गरज जशी काही वर्षांपूर्वी होती आता तशी नाही आहे. ग्राहकांची  माहिती आणि आमच्या संशोधन निष्कर्षांवर आधारित आम्ही असे उत्पादन तयार केले आहे जे कोणत्याही व्यक्तीच्या बदलत्या आयुष्याच्या गरजा पूर्ण करेल.

या योजनेत तीन पर्याय उपलब्ध आहेत, आणि प्रत्येक पर्याय अद्वितीय ऑफर प्रदान करते. विशेषकरून इनकम प्लस ऑप्शन, जे वयाच्या ६० वर्षानंतर व्यक्तीसाठी  नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून कार्य करते. कोणतीही  व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार स्वतःसाठी सगळ्यात उपयुक्त पर्यायाची निवड करू शकते. आम्हाला विश्वास आहे की ग्राहक उत्पादन मूल्य पाहतील आणि ते स्वत:ला  आणि त्यांच्या कुटुंबाला  सुरक्षितता प्रदान करण्यासाठी वापरतील.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close