Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार,काँग्रेसच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

मुंबई | औरंगाबदच्या नामांतरावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. काँग्रेसने आपला नामांतराला जाहीरपणे विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र स्व. बाळासाहेबांचं बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं त्यामुळे ते पूर्ण करणार असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेला इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुनाच कार्यक्रम आहे. मात्र सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही. आघाडीची सरकारं किमान समान कार्यक्रमांवर चालतात, असं संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. किमान समान कार्यक्रम काम करण्यासाठी तयार केला आहे. नाव बदलण्यासाठी नसल्याचं म्हणत संजय निरूपम यांनी शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला आहे.दरम्यान, औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. नामकरणाला आमचा कायम विरोधच राहणार असल्याचं अशोक चव्हाण यांनीही म्हटलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close