Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

युवकांनी एका विचाराने पुढे आले तरच भविष्य घडू शकते :आ.रोहित पवार


उस्मानाबाद : नवनवीन टेक्नॉलॉजी सर्व क्षेत्रात येत असून या टेक्नॉलॉजीने माणसाची जागा घेतली आहे. तर यापुढे दर दहा वर्षांनी शासकीय नोकरीतील दहा टक्के जागा कमी होणार आहेत. त्यामुळे सर्व युवकांनी कोणतीही जात-पात, गट-तट व धर्म न मानता एकत्र येत एका विचाराने पुढे येऊन उद्योगासाठी चळवळ उभी केली तरच भविष्य घडू शकणार आहे. तसेच भाई उद्धवराव पाटील यांच्या विचाराचा वसा आणि वारसा युवकांनी राजकारणात टिकवावा असे आवाहन आ. रोहित पवार यांनी दि.२१ जानेवारी रोजी केले.
भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त भाई उद्धवराव पाटील विचार मंच उस्मानाबादच्यावतीने कोरोना कालावधीत कोरोनाची बाधा होऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. संजय (मामा) शिंदे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रा. आदित्य पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पवार  म्हणाले की, उद्धवराव पाटील यांचे तत्व अनेकांना भावते काहीही झाले तरी ते तत्व सोडत नसत. ज्यांनी आपल्याला प्रेम दिले अशा लोकांना ते कधीच विसरले नाहीत त्यांच्याकडून नव्या पिढीने अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना जीवन, कार्य व त्याग करण्याची पद्धत या भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचा आपल्या सर्वांना अभ्यास करावा लागेल व तो गरजेचा आहे. विशेष म्हणजे ज्या विचाराने ताकद दिली, आपण मोठे झालो, त्यामुळे आपण काम करू शकलो अशा विचारांना रामराम करतात ते तत्व अजिबात आचरणात आणणे उपयोगाचे होणार नाही. तर व्यक्तिगत हितासाठी राजकारण केले तर ते कधीही टिकणार नसल्याचा इशारा देत ते म्हणाले की, लोकांना तुम्ही जे काय करता ते सर्व समजत आहे. लोक एवढे भोळे आहेत असे मुळीच समजून चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या विरोधात किंवा एखाद्या राज्याच्या विरोधात निर्णय घेतला तर तो अयोग्य असल्यास त्याचा उघडपणे विरोध करून निषेध नोंदविला पाहिजे मग तो स्व पक्षाचा असला तरी त्याची भीडभाड ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. तर कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, पूर्वी खाऊन-पिऊन शेती हा व्यवसाय चालत असल्यामुळे सर्व ग्रामीण भागातील जनता सुखी होती. मात्र गरजा वाढल्यामुळे गावातील माणसे शहरात जगायला बाहेर पडत असल्याने गावातील सर्व पैसा दुसरीकडे जात आहे. सध्याची पिढी व्हाट्सअप विद्यापीठाचा अभ्यास करीत नसून आलेला एखादा मजकूर त्याची सत्यता व पडताळणी न पाहता त्यावर विश्वास ठेवत आहेत हे अत्यंत धोक्याचे आहे. मनामध्ये जी सेट निर्माण झाली आहे तीतेड निवडण्याचे काम युवकांचे असून नव्या काळाचे ते सोडविण्यासाठी नवीन मांडणी करावी लागेल व गावातील अडकलेल्या माणसाचा आक्रोश बाहेर पडला तरच त्यातून सुटका होईल असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक प्रा. आदित्य पाटील यांनी व उपस्थितांचे आभार प्राचार्य पी.एन. पाटील यांनी मानले. हिंदी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार करणाऱ्या व स्वच्छता करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये बालाजी चौगुले, अजिंक्य जानराव, दिगंबर डुकरे, शेख जलील शेख हैदर, विलास माने, बाजिमिया फकीर शेख, आदित्य जानराव, अरबाज पठाण, सुधाकर पांडागळे, जमील शेख व एस.बी. कांबळे यांचा समावेश आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close