Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग,गॅस सिलेंडरचा स्फोट मोठी हानी टळली

दुरूस्ती दारासह तिघे मायलेक बाल बाल बचावले

भोकरदन /सुरेश गिराम
शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान शहरातील जाफ्राबाद रोडवरील एका गॅरेज वर दुरुस्ती चे काम सुरू असता अचानक गाडीमध्ये आग लागून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात एका कारदुरूस्तीदारासह तिघे मायलेक बाल बाल बचावले आहे.सदरील घटनेच्या मिळलेल्या माहितीनुसार कीकन्नड तालुक्यातील करंजखेडा येथील एक कुटुंब भोकरदन तालुक्यातील विरेंगाव येथे काही कार्यक्रमानिमित्त येत होते .
वाचा सविस्तर news आरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…

त्यांच्या गाडीत काही बिगाड आल्यामुळे त्यांनी वरील ठिकाणी गाडी दुरुस्ती साठी उभी केली होती दरम्यान दुरूस्तीदार गाडीच्या आत बसून  काम करत असतांना अचानक गाडीने पेट घेतला त्यात एक पंचवीस वर्षीय महिला व तिचे दोन लहान लहान मुले बसलेली होती या अपघातात दुरुस्तीदाराचा हात होरपळून निघाला असून बाकीच्यानां किरकोळ घाव आल्याचे सांगितले आहे.दरम्यान गाडी मध्ये LPG सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी तेथील नागरिकांची हिंमत लागत नव्हतीपंधरा ते वीस मिनिटानंतर गाडीमध्ये आगीने रौद्ररूप धारण केले होते तर गाडीमध्ये असलेल्या सिलेंडर चा मोठा स्फोट झाला होता .
वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

यावेळी जमलेल्या लोकांनी अजून लांबवर पळ काढला होता तर या ठिकाणी ईतर गाड्या ही दुरुस्तीसाठी उभ्या होत्या  त्याचे ही भीषण आगीमुळे पिघळून नुकसान झाले होते.तासाभरात गाडीची आग कमी होत होत तेथील नागरिकांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी,रेती,फेकेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती तर ही आग भीषण असल्याने आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close