Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादमधील पहिली शिवसेना हेल्पलाईन: आमदार अंबादास दानवे

औरंगाबादमधील पहिली शिवसेना हेल्पलाईन: आमदार अंबादास दानवे

औरंगाबाद: खरं तर सर्वांची मदत आणि सहकार्य करणे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यांच्यामुळे सहकार्य व मदत करण्याची भावना प्रत्येक शिवसैनिकांच्या रक्तात आहे. एक शिवसैनिक व शिवसेनेचा कार्यकर्ता या नात्याने औरंगाबादमधील निष्ठावंत शिवसैनिक रामेश्वर कोरडे यांनी चिकलठाणा येथे सुरु केलेल्या ‘शिवसेना हेल्पलाईन’ नागरिकांच्या सेवेत सादर करतांना अत्यानंद होतोय, असे गौरवोद्गार आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी काढले.

ते म्हणाले, कि या माध्यमातून सर्वसामान्यांना दैनंदिन भेडसावणारे प्रश्न शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि औरंगाबादमधील प्रत्येक शिवसैनिकांच्या मार्फत सोडविण्यासाठी समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच होईल. या माध्यमातून शासकीय हॉस्पिटल, शासकीय योजना, महापालिका, महावितरण, शिक्षण, रोजगार आणि महिला गृहउद्योग या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविल्यास जनतेला नक्कीच त्याचा फायदा होईल. या हेल्पलाईनचे अनुकरण इतरांनी करून सर्वसामान्यांच्या अडचणी कशा सोडविल्या जातील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

कोरोना अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. दानवे यांनी केले.

यावेळी रामेश्वर कोरडे म्हणाले कि, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना बघून मी लहानाचा मोठा झालो. हेल्पलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार.

शिवसेना हेल्पलाईन सॉफ्टवेअरमध्ये होणार नोंद

तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शिवसेना हेल्पलाईन या नावाने एक स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. त्यात संबधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि त्यांना हवी असलेली मदत याची नोंद होईल. त्यानंतर संबधित विभागातील व्यक्तीकडे अडचण सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. या अर्जाची प्रत प्रिंट करता येण्याची सोय असेल.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजु वैद्य, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, बाबासाहेबजी डांगे, रमेश दहिहांडे, ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक कमलाकर जगताप, दामु आण्णा शिंदे, मनोज गांगवे, देवेंद्र सोळंके, वल्लभसेठ भंडारी, भाऊराव बनकर, दुर्गाताई भाटी, भागूबाई शिरसाठ, सोमनाथ नवपुते, विष्णु गुंठाळ, लक्ष्मन पिवळ, भाऊसाहेब राते, विष्णु रिठे  होते. त्यासह शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close