Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर/ प्रभाकर पाटील

भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले.आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव गाजवलेले,देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने  निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती शोकात बुडाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.खंचनाळे हे मुळचे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील एकसंबा या गावचे रहिवासी होते.कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत सराव करत त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामांकित मल्ल म्हणून परिचीत झालेले खंचनाळे नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. या काळात त्यांनी देशातील अनेक मल्लांना चितपट केले. ज्यामुळे त्यांचा अनेक पुरस्काराने गौरव झाला.नवी दिल्ली येथे ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला आस्मान दाखवत ते हिंदकेसरी झाले. कोल्हापूरचा पहिला मल्ल हिंदकेसरी झाला. खंचनाळे तेव्हापासून कोल्हापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते . हिंदकेसरी झाल्यानंतर त्यांनी कराड येथे झालेल्या लढतीत अनंत शिरगांवकर यांना हरवून ते ‘महाराष्ट्र केसरी’ झाले. महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक भूषण’ पुरस्कार देत त्यांच्या कुस्ती कलेचा सन्मान केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीची नाळ कायम ठेवताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. ते राष्ट्रीय तालीम संघाचे पाच वर्षे अध्यक्ष होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close