Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

साले म्हणणाऱ्यांच्या बेगडी प्रेमाने शेतकरी वळणार नाहीत …!; माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे सणसणीत प्रत्युत्तर

mh20live Network

जालना: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष काम करत आहेत. कुण्या ऐऱ्या – गैऱ्या ने त्यांचा एकेरी उल्लेख करून संकटात राजकारण करू नये. शेतकऱ्यांना साले म्हणाणाऱ्यांच्या बेगडी प्रेमाने शेतकरी वळणार नाहीत. असे सणसणीत प्रत्युत्तर शिवसेना नेते , माजी मंत्री , तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांना घरात बसून कोरोना होईल का..? असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काल पैठण येथे जाहीर सभेत केले होते. त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी ( ता. १९) शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमुक्ती,कोरोना महामारी वर मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मिळालेला विजय, शेतकर्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या कार्याचे जाहीर समर्थन केले.तसेच संकटात भारतीय जनता पक्षाने घाणेरडे राजकारण करू नये असा सल्ला ही श्री खोतकर यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत ची कर्ज मुक्ती मिळाली. कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीवर यशस्वीपणे मात करून आजही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घरात बसून नाहीत तर प्रत्यक्ष काम करत आहेत.एवढ्यावरच न थांबता उद्या पासून राज्याचा दौरा करून पाहणी करण्यासाठी बांधावर जात आहेत.तर ना. अब्दुल सत्तार हे उद्या जालना जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येत आहेत.असे सांगून अर्जुनराव खोतकर म्हणाले, कृषी मंत्र्यांसह सर्व पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात पाहणी करून आलेत. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने गळे फाडणारे त्यांच्या मतदारसंघात तरी गेले का❓ असा सवालही अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित केला.
भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय झाली असून संकटकाळात राजकारण न करता सर्वपक्षीयांनी एकञ बसून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे वातावरण निर्माण करायला हवे. अशी अपेक्षाही खोतकर यांनी व्यक्त केली.

राज्यपालांनी राजीनामा देऊन प्रायश्चित्त करावे…!
मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पञाचा देशपातळीवर निषेध केला जातोय. ते चुकीचे वागले असे खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एका ठिकाणी बोलतांना टि. व्ही वर पाहिले. चुकीचे प्रायश्चित्त म्हणून राज्यपालांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी ही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close