Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जयंतीनिमित्त तात्पुरता पुन्हा चबूतऱ्यावर बसवावा

जिल्हा शिवजयंती शिष्टमंडळाची मनपा आयुक्तांकडे मागणी


औरंगाबाद :गेली दोन वर्ष झाली मात्र अद्यापही औरंगाबाद महानगर पालिकेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील स्मारकाचे काम पूर्ण केले नसल्याने शिवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात पूर्वी असलेला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा शिवजयंतीनिमित्त तात्पुरता पुन्हा चबूतऱ्यावर बसवावा तसेच शिवजयंती निमित्त विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आलेल्या निवेदनात औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, नवनिर्वाचित उत्सव समिती अध्यक्ष जगन्नाथ काळे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, भाऊसाहेब जगताप, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती, मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गेल्या ५२ वर्षांपासून क्रांतिचौक येथे सर्वधर्मीयांकडून शिवजयंती निमित्त पूजन केल्या जाते. महाराजांच्या प्रति जनतेच्या मनामध्ये श्रद्धेची भावना आहे. आणि ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून बऱ्यापैकी काम पूर्ण झालेल्या चबूतऱ्यावर जनभावनेचा आदर करून यावर्षी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त पूजन करण्यासाठी चबूतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा तात्पुरता स्वरूपात बसवावा, तसेच पुतळा परिसरात शिवजयंती निमित्त विद्युत रोषणाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे केली. कोरोनाचे संकट असले तरी शिवजयंती शासनाच्या व आरोग्य विभागाच्या नियमानुसारच साजरी करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close