Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही केली सुरु प्राप्त झालेली नुकसानीची प्राथमिक माहिती केली जाहीर

अलिबाग,जि.रायगड,दि.30 :- महाड व पोलादपूर तालुक्यात दि.22 व 23 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याची घटना घडली आहे.  त्यामध्ये लोकांची घरे वाहून गेली असून अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही सुरु केली आहे.  हे पंचनामे सुरु असून दि.26 जुलै ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार प्राप्त झालेली नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.  पंचनाम्याची कार्यवाही अजूनही सुरु आहे.

पंचनाम्याच्या कार्यवाहीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

झालेल्या नुकसानीबाबतची दि.26 जुलै ते 29 जुलै या कालावधीतील पंचनाम्यानुसार प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे-

महाड तालुक्यातील नुकसानीबाबतची माहिती :-  एकूण बाधित  कुटुंब संख्या 14 हजार 368 त्यापैकी पंचनामे  झालेल्या  कुटुंब संख्या 8 हजार 151 शिल्लक  पंचनामे कुटुंब संख्या 6 हजार 217 घरे अंशतः संख्या 8 हजार 121, घरे  पूर्णतः संख्या 30, गोठे/वाडा संख्या 10, दुकाने संख्या 0, मंदिर संख्या  1,अंगणवाडी संख्या  1, शाळा संख्या  2,सार्वजनिक मालमत्ता संख्या 3, मोठी जनावरे संख्या 11, छोटी जनावरे संख्या 2,  बकरी संख्या  15,कोंबड्या संख्या 0, शेती विविध प्रकारची नुकसान क्षेत्र हे आर मध्ये 84.44 हे आर , एकूण बाधित शेतकरी संख्या 441 इत्यादी झालेले नुकसान आहे.

पोलादपूर तालुक्यातील नुकसानीबाबतची  माहिती :- एकूण बाधित  कुटुंब संख्या 751 त्यापैकी पंचनामे  झालेल्या  कुटुंब संख्या 560 शिल्लक  पंचनामे कुटुंब संख्या 191 घरे अंशतः संख्या 552, घरे  पूर्णतः संख्या 8, गोठे/वाडा संख्या 18, दुकाने संख्या 0, मंदिर संख्या  1,अंगणवाडी संख्या  2, शाळा संख्या  0, सार्वजनिक मालमत्ता संख्या 2, मोठी जनावरे संख्या 32, छोटी जनावरे संख्या 0, बकरी संख्या 8, कोंबड्या संख्या 5, शेती विविध प्रकारची नुकसान क्षेत्र हे आर मध्ये 30.00 हे आर, एकूण बाधित शेतकरी संख्या 121, इत्यादी झालेले नुकसान आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close