Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा निर्णय लवकरच:मंत्री एकनाथ शिंदे


जनभावनेचा विचार करता शहराच्या नामांतरास कोणी विरोधी करण्याचे कारणच नाही

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे व्हावे, ही जनभावना आहे. जनतेची तशी इच्छा आहे. त्यामुळेच हा अस्मितेचाही विषय आहे. जनभावनेचा विचार करता शहराच्या नामांतरास कोणी विरोधी करण्याचे कारणच नाही. लवकरात लवकर नामांतराचा निर्णय होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच जनभावनेच्या विरोधात कोणीही जाऊ नये, जे विरोधात जातील त्यांना…, अशा शब्दांत मंत्री शिंदे यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी औरंगाबाद दौर्‍यावर आले होते. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जुनाच मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे नामांतर होणार का, या प्रश्नावर मंत्री शिंदे म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे व्हावे ही शिवसेनेची सुरूवातीपासूनच भूमिका राहिली आहे. ती स्थानिक जनतेचीही भावना आहे. जनतेला जे हवे ते करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे लवकरच संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय होईल, असे शिंदे यांनी नमूद केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close