Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कांदा चाळीत टिकेना उत्पादन खर्चहि निघेना


वैजापूर / अर्जुन तेलंगे /mh20live Network
: परिसरात वाढती उष्णता व अवकाळी पावसाने परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्याच्या नाकी नऊ आणले आहे त्यामुळे साठवुनिकीसाठी चाळीत भरलेला कांदा खराब होत असुन एका महिण्यातच चाळीत भरलेला कांदा बाहेर काढण्यासाठी शेतकर्याची लगबग सुरू असुन मातीमोल भावामुळे कांदा पिकासाठी केलेला उत्पादण खर्चही निघत नसल्याने शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत गेला आहे मागील वर्षी चागला पाऊस झाल्याने परिसरात नामकाच्या पाण्याने पाणी पातळी वाढल्यामुळे त्यातच काद्याने उच्चाकी दर मिळाल्यामुळे वैजापुर  तालुक्यात मोठ्या प्रमाणात काद्याची लागवड करण्यात आली होती परंतु गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात वाढती उष्णता व अवकाळी पावसाने परिसरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे आता शिल्लक राहिलेला थोडाफार कांदा लाॅकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने  शेतकर्यानी लाखो रुपये खर्च करून चाळीत भरला परंतु एकच महिण्यात वाढत्या उष्णतेमुळे कांदा चाळीतच खराब होत असुन उतरत्या बाजारभावाअभावी शेतकर्यानां आपला कांदा शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला असुन याबाबत शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यानां मदत करण्याची मागणी परिसरातुन होत आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close