Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

दोन कोरोनाबाधित सापडल्याने हिवरा गावची चिंता वाढली

mh20live.com
करमाड : सुदाम पठडे

येथुन हाकेच्या अंतरावर असलेल्या हिवरा (ता.औरंगाबाद) या छोटयाशा गावात दोन कोरोना बाधित रूग्ण आढळुन आलेले आहेत.त्यामुळे कोरोना संसर्ग रोगाने आता ग्रामीण भागात पाय पसरायला प्रारंभ केला हे स्पष्ट होत अाहे. हिवरा येथील एक तरूण गोलटगाव येथे महावितरणमध्ये लाईनमन म्हणुन काम करतो.एका मित्राला  माेबाईल घेवुन देण्यासाठी तो करमाड येथील कोरोनाबाधित मालक असलेल्या मोबाईल शाॅपिमध्ये आला होता.त्यामुळे गेल्या दाेन तीन दिवसापासुन त्यास ताप येण्यास प्रारंभ झाला होता.म्हणुन त्या लाईनमन ने मंगळवारी पत्नीसह दोघांचे स्वॅब तपासणीसाठी दिले असता बुधवारी दोघांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

त्यामुळे या दोघांना उपचारासाठी बीड रोडवरील कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान बुधवारी या लाईनमनच्या संपर्कातील पाच कुटुंबीयासह सटाणा व नागोणीची वाडी येथील प्रत्येकी एक अशा सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे गांधेलीतील,कचनेर,करमाउ येथील प्रत्येकी एक पांढरी पिंपळगाव चार,पळशी 10 अशा एकुण 26 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती करमाड येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विक्रम ठाकरे यांनी दिली.या सर्व घडामोडीमुळे आता ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होतो की काय या शंका कुशंकाने भिंतीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय लाडगाव/ हिवरा येथे दोघे कोरोना  पॉजिटीव्ह आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सील करत फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार कृष्णा कानागुले, सरपंच सुरेखा कल्याण गाडेकर, उपसरपंच,संतोष बागल, ग्रामविकास अधिकारी  चव्हाण डी. एस, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी बागल,भरत शेजवळ, मनोज गाडेकर ग्रामपंचायत कर्मचारी तलाठी, संतोष लोळगे,  पोलीस पाटील कथार अप्पा, सुभाष बागल,  राजू पोफळे, संजय पोफळे, विष्णु पोफळे आरोग्य कर्मचारी शिवाजी तायडे, आशासेविका, स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close