Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हाधिकारी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

शहरातील 3 सेंटर्सला दिली भेट : कोविड योध्यांचे वाढविले मनोधैर्य
रुग्णांशी साधला संवाद : एमआयटी येथील रिकव्हरी रुमची पाहणी

औरंगाबाद mh20live.com दि.5: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज शहरातील पद्मपुरा येथील Emergency Operation Center, एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आणि कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेज येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तिन्ही ठिकाणच्या सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच रुग्णांचे म्हणणे ऐकून त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करुन त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. तसेच तिथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. त्यांनी प्रथम पद्मपुरा येथील Emergency Operation Center ला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचांरी यांच्याशी संवाद साधला. तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधला. तेथील पुर्ण परिसर आणि व्यवस्थेची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रुग्ण,डॉक्टर तसेच इतर कर्मचारी यांचा भाग स्वतंत्र ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश देत तेथील सर्व यंत्रणा उत्तमरित्या काम करत असून घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याठिकाणी 41 रुग्ण उपचार घेत असून 70 खाटांची क्षमता या सेंटरमध्ये आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना अनेक रुग्णांनी येथील व्यवस्था आणि पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.
एमआयटी कॉलेज हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, फॅसिलेटी इंचार्ज यांच्यासह येथील विविध मजल्यावरील रुग्णांशीही जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. याठिकाणी 221 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची घेण्यात येणाऱ्या उत्तम देखभालीबद्दल अनेक रुग्ण यावेळी भावनिक झाले होते. येथे दाखल असणाऱ्या कुटुंबांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. . यावेळी येथील सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘येथील कर्मचारी गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने कार्यरत असून ते इतरांसोबतच स्वत:ची देखील अत्यंत काळजी घेत आहेत. या रुग्णांची काळजी घेत असणाऱ्या इथल्या डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी यांच्यावर कोणताही ताण-तणाव दिसला नाही उलट इथे सर्वांमध्ये दिसणारा उत्साह पाहून मला आनंद झाला असल्याचे सांगुण जिल्हाधिकारी म्हणाले की, जर कोविड सेंटरममध्ये भरती असणाऱ्या एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन कमी झाला असेल आणि त्याला पुढील उपचारासाठी भरती करेपर्यंत रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात रिकव्हरी रुममध्ये ऑक्सिजन देऊन स्थिर केल्या जाते. अशा प्रकारची स्पेशल रिकव्हरी रुम इतर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना निर्देश दिले. इथे उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 9 दिवस उपचार घेणारे रुग्ण घरी जाण्यासाठी उत्सुक होते पण त्यांनी मला आवर्जुन सांगितले की, मागचे 9 दिवस येथे आमची उत्तम काळजी घेण्यात आली. आम्ही इतर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना देखील उपचारासाठी एमआयटी कॉलेजमध्येच येण्याचे आवर्जुन सांगू असे सांगुण जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की याठिकाणी गाणी ऐकण्याच्या मनोरंजानाच्या सुविधेमुळे रुग्णांना थोडा विरंगुळा मिळत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
एमआयटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेजच्या पंचकर्म विभागाच्या इमारतीध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. या सेंटरमध्ये 71 रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीनच सुरू झालेल्या या कोविड सेंटरमधील आयुर्वेदीक महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन एमआयटी कॉलेजचे अनुभव सांगुन त्यांचे मनोबल वाढविले त्यांनी या कार्यांत प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close