Subscribe to our Newsletter
क्राईम

गांवचा जावाईच निघाला बैल चोर

बैल चोरांस पकडण्यात कन्नड ग्रामीण पोलिसांना यश आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

-कन्नड – तालुक्यातील सितानाईक तांडा शिवारातील शेतातील गोठयातून दोन बैल चोरी करून पसार झालेल्या दोन  चोरांच्या मुसक्या आवळण्यात कन्नड ग्रामीण पोलीसांना यश आले असून या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यांना  न्यायालायसमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की  कोळवाडी तांडा  येथील शेतकरी संजय शिवलाल राठोड यांचे सीतानाईक तांडा शिवारातील शेतातून ऑगस्ट महिन्यात शेतातील गोठ्यात आणि गोठ्याबाहेरील बांधलेले दोन बैल चोरट्यांनी चोरून नेले होते.त्यासंदर्भात संजय राठोड यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली होती.त्यानुसार कन्नड ग्रामीण पोलिसांनी कसोशीने तपास करत  दि.6 नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिप भिवसने पोलीस कॉन्स्टेबल संजय आटोळे, पोलीस नाईक शिंदे यांनी कारवाई करत आरोपी गोपीनाथ साईदास जाधव  (मूळ रा. बोलटेक तांडा ता.कन्नड )यास संगमनेर साखर कारखाना  येथून तर दुसरा आरोपी फुलसिंग तुंबडू जाधव यास बोलटेक तांडा ता.कन्नड येथून ताब्यात घेतले.दोघांना कन्नड न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.संजय आटोळे हे करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close