Subscribe to our Newsletter
क्राईम

भोकरदन:बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह शेततळ्यात आढळला

पेरजापूर मधील घटना चौथ्या दिवशी शेततळ्यात सापडला मृतदेह

MH20LIVE NETWORK

भोकरदन प्रतिनिधी/सुरेश गिराम

दिनांक 15 नोव्हेंबर 2020 रविवार.तालुक्यातील मौजे पेरजापूर येथील पाचवीत शिकणारा अकरा वर्षीय ज्ञानेश्वर भानुदास जाधव हा मुलगा गुरुवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान घरातून निघून गेला होता मात्र त्याचा आज रविवारी रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान पेरजापूर सुभानपूर शिवारात असलेल्या एका शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
याबाबत समजलेली माहिती अशी की गुरुवारी रोजी ज्ञानेश्वर हा गावातील हौदात होण्यासाठी हट्ट धरत होता त्या कारणाने वडील भानुदास जाधव यांनी थंड पाण्यामध्ये आंघोळ करू नकोस तुला सर्दी होईल ताप येईल असे म्हणून ते त्याच्यावर रागावून त्याला दम दिला.


त्यानंतर ज्ञानेश्वर हा घरी आलाच नाही सायंकाळी देखील तो घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले मात्र रात्री देखील तो घरी परतला नाही. त्यानंतर ज्ञानेश्वर हा गायब झाल्याची चर्चा गावात पसरली व त्यानंतर गावकऱ्यांनी देखील त्याचा आजपर्यंत कसून तपास घेतला. ज्ञानेश्वर हरविल्याची माहिती देखील पोलिसांना देण्यात आली होती. मात्र आज दुपारी अडीच वाजता दरम्यान पेरजापूर सुभानपूर शिवारात असलेल्या गावातीलच शेततळ्यात आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली त्यानंतर जमादार श्री नागरगोजे व पोलीस कॉन्स्टेबल समाधान जगताप व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन आले. ज्ञानेश्वर यास एक मोठा भाऊ आहे. घडलेल्या या घटनेमुळे पेरजापूर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close