Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

पत्रकारीतेतील वटवृक्ष : वसंतराव मुंडे सायकलवरून पेपर वाटप ते राज्यातील सर्वात मोठ्या पत्रकार संघाचा अध्यक्ष ही वसंतराव मुंडे यांची वाटचाल

पत्रकारीतेतील वटवृक्ष : वसंतराव मुंडे  सायकलवरून पेपर वाटप ते राज्यातील सर्वात मोठ्या पत्रकार संघाचा अध्यक्ष ही वसंतराव मुंडे यांची वाटचाल जेवढी संघर्षाची तेवढीच प्रेरणादायी आहे… मजूरांवर अन्याय झाल्याच्या एका प्रसंगातून पत्रकारीतेचे आकर्षण निर्माण झालेल्या वसंतराव यांना पत्रकारितेत पाऊल ठेवण्यासाठी सुरूवातीच्या काळात सायकलवरून पेपर वाटप करावा लागला… एकेकाळी पेपर वाटणारा हा युवक पुढे चालून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा सारख्या दिग्गज आणि सर्वाधिक सदस्य असलेल्या पत्रकारांच्या चळवळीचा राज्य पातळीवरील नेता बनेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते… मात्र टोकाचा संघर्ष, प्रचंड परिश्रम, सिध्दहस्त लेखणी, सकारात्मक दृष्टीकोण, सर्वपक्षीय नेत्यांशी ऋणानुबंध आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याच्या गुणामुळे वसंतराव मुंडे हे पुणे, मुंबई अशा शहरातील पत्रकारांचे नेतृत्व करत आहेत… ते ज्या पत्रकार संघाचे नेतृत्व करतात त्या संघटनेत राज्य व देशपातळीवरील वर्तमान पत्रात पत्रकारिता दिग्गज मंडळी आहे… बीड सारख्या मागास आणि छोट्या शहरातील एक पत्रकार एवढ्या मोठ्या पत्रकार संघाचा राज्याध्यक्ष बनतो ही गोष्टच मुळात बीडच्या वैभवात भर टाकणारी आहे…      वसंतराव यांच्या सारखा अभ्यासू, ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांची जाण अन् तळमळ असलेला संवेदनशिल मनाचा भुमीपुत्र सर्वात मोठ्या पत्रकार संघाचा राज्याचा अध्यक्ष झाल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण पत्रकारांचे प्रश्‍न चव्हाट्यावर आले… नुसते चव्हाट्यावरच आले नाहीत तर मंत्रालयात बसून अनेक प्रश्‍न त्यांनी सोडवले आहेत… पत्रकार पेन्शन, पत्रकार हल्ला विरोधी कायदा, ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती, पत्रकार कल्यान निधी असे कितीतरी प्रश्‍न त्यांनी राज्यकर्त्यांना धारेवर धरून मार्गी लावले आहेत… पत्रकारांच्या प्रश्‍नावर सोलापुर येथील एका आघाडीच्या वृत्त वाहीनीने वसंतराव मुंडे यांची घेतलेली मुलाखत राज्यभर गाजली. कारण पत्रकार सर्वांच्या प्रश्‍नावर बोलतात, वंचीत उपेक्षीतांचा आवाज बनण्याचे काम पत्रकार करतात. परंतू पत्रकारांच्या प्रश्‍नावर कोणीच बोलत नाही. पत्रकार संघाचा राज्याध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदाच वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना ऐरणीवर आणले… सर्व समाज घटकांसाठी, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी सरकारची कुठली ना कुठली योजना आहे. मात्र पत्रकार हा समाजातील एकमेव घटका असा ज्याच्यासाठी कोणतीच योजना नाही, हे त्यांनी पहिल्यांदा जाहिरपणे सांगीतले… सरकार सर्वांना घरे बांधून देते… प्रत्येकासाठी घरकुल योजना आहे… मग पत्रकारांसाठी ती नाही? फाटका खिसा, बीन पगारी नोकरी, रहायला घर नाही, सरकारची कोणतीच योजना नाही… या परिस्थितीत पत्रकारांनी कधीपर्यंत रहायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला… ईतिहासात पहिल्यांदाच राज्यभरातील पत्रकारांचा प्रश्‍न तळमळीने मांडल्यामुळे ही मुलाखत प्रचंड लोकप्रीय ठरली… ही मुलाखत आणि लोकपत्रकार यांनी घेतलेली मुलाखत राज्यातील दोनशेहून अधिक वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली… या नंतर विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून राज्यभर दौरा करून वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांचे प्रश्‍न जाणून घेतले… त्यांच्याशी चर्चा केली… तत्पुर्वी विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर ग्रामीण पत्रकारांनाही अधिस्विकृती मिळाली पाहीजे यासाठी त्यांनी माहिती संचालकांना बीडमध्ये बोलावून पत्रकार, पत्रकार संघटना आणि शासनाच्या प्रतिनिधींमध्ये खुली चर्चा घडवून आणली…. विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष म्हणून वसंतराव मुंडे यांनी दिलेल्या योगदानामुळे ग्रामीण भागातील शेकडो पत्रकार अधिस्विकृती धारक बनले आहेत… औरंगाबद आणि बीड येथे प्रत्येक आठवड्याला विविध क्षेत्रातील एका मान्यवराला बोलावून चर्चा सत्राचे आयोजन करून पत्रकार व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या प्रश्‍नावर सातत्याने चर्चा घडवून आणण्याचा उपक्रम मागील तीन- चार वर्षापासून अखंडपणे सुरू आहे… वसंतराव मुंडे, संतोषजी मानुरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम प्रचंड लोकप्रीय झाला आहे…   पत्रकार संघाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून वसंतराव मुंडे यांनी केवळ पत्रकारांचे प्रश्‍न मांडले असे नव्हे तर छोट्या- मोठ्या वर्तमान पत्रांचे प्रश्‍नही शासन दरबारी मांडले आहेत… उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत विकले जाणारे वर्तमान पत्र हे जागातील एकमेव प्रोडक्शन असल्याचे संपादक बांधवांना पटवून देत, आपण आपली किंमत जो पर्यंत वाढवणार नाहीत तो पर्यंत वर्तमानपत्र आणि पत्रकारांना चांगले दिवस येणार नाहीत, हे त्यांनी राज्यभर दौरा करून तळमळीने सांगीतले आहे… त्यांनी केलेल्या या आवाहनाला अनेक संपादकांनी प्रतिसाद देत आपल्या वर्तमानपत्राची किंमत वाढवली आहे… सोशल मिडीयाच्या जमाण्यात घटनेच्या बातम्याला महत्व उरले नसून जे लोकांना माहीत आहे, तेच आपण सांगीतले लोक पेपर कशाला वाचतील? असा प्रश्‍न उपस्थित करून बदलत्या काळाबरोबर पत्रकारांनी देखील बदलले पाहीजे… लोकांना काय हवे? त्यांची रूची काय? हे ओळखून पत्रकारांनी अधुनिक तंत्रज्ञान शिकले पाहीजे… ज्या लोकांपर्यंत कोणतेच माध्यम जात नाही अशा लोकांपर्यंत पत्रकारांनी गेले पाहीजे… अशा मोटीवेशन स्पीचच्या माध्यमातून लोकांना आरसा दाखवणार्या पत्रकारांना देखील आरसा पाहण्याचे त्यांनी सुचवले आहे…   मराठवाड्याला अनंत भालेराव यांच्या सारख्या कर्मयोगी पत्रकारांचा आणि मरावाडा सारख्या निर्भीड, सामाजिक चळवळींना वाहुन घेतलेल्या वर्तमान पत्रांचा वारसा आहे… बीडमध्ये स्व.मोतीरामदादा वरपे, अमर हबीब, नामदेवराव क्षीरसागर, नरेंद्रकाका कांकरीया, अशोकअप्पा देशमुख, सर्वोत्तमअण्णा गावरस्कर, सुनील क्षीसागर, गंमत भंडारी, दिलीपराव खिस्ती, शेख तय्यब या पत्रकार आणि संपादकांचा वारसा आहे… या विशाल वारशाला वसंतराव मुंडे यांनी अधिक उंचीवर नेले आहे… पत्रकारिता ही केवळ बातमी लिहिण्या एवढी मर्यादित नसते तर पत्रकार सामाजिक चळवळी उभ्या करू शकतात… विकासासाठी गावे दत्तक घेऊ शकतात… चांगले काम करून ग्रामपंचायतींनी पुरस्कार मिळवून देऊ शकतात… निव्वळ सेवाभावी वृत्तीने काम करणार्या संस्थांना मार्गदर्शन आणि बळ देऊ शकतात…  राज्यकर्त्यांना चांगल्या कामासाठी पुढाकार घ्यायला लावू शकतात… वेगळ्या विचाराच्या, वेगवेगळ्या पक्षांच्या बड्या नेत्यांना एका व्यासपीठावर आनु शकतात… सरकारला लोकोपयोगी निर्णय घ्यायला आणि चुकीचे धोरण बदलायला लावू शकतात… एवढेच नव्हे तर बीड जिल्ह्यासारख्या छोट्या आणि मागास जिल्ह्यातील पत्रकार राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवू शकतात….  हे वसंतराव मुंडे, संतोषजी मानुरकर यांनी दाखवून दिले आहे. यामुळेच  वसंतराव मुंडे हे पत्रकारीतेतील आधारवड आहेत, असे मला वाटते… पत्रकारांचा हा आधारवड असाच उंचावत जावो… परिस्थितीने रांजल्या- गांजलेल्या राज्यभरातील पत्रकारांना या आधारवडाची सावली मिळावी… तेवढा तो मोठा व्हावा, याच वसंतराव मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा…! वसंतराव मुंडे साहेबांविषयी शब्द रूपी शुभेच्छा देताना एका हिंदी कविच्या ओळी आठवतात… कई जीत बाकी है कई हार बाकी है,अभी तो जिंदगी का सार बाकी है।यहां से चले हैं नई मंजिल के लिए,यह तो एक पन्ना था, अभी तो पुरी किताब बाकी है॥
– बालाजी तोंडे, बीड

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close