Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पाचोड येथे कृषिदुत सांगतोय शेतकऱ्यांना शेतीविषयक उपयुक्त सल्ला

औरंगाबाद -तालुक्यातील पाचोड येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद येथील कृषिदुत सुयोग पवार यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक ॲप्स बद्दल माहिती दिली तसेच अनेक नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देत माहिती सांगितली. तसेच पिकांचे नियोजन, एकात्मिक कीड व्यवस्थापन रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यांचा संतुलित वापर, जमिनीची सुपीकता यासह अनेक विषयांबाबत जनजागृती केली.
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये असणारे शेतमालाचे बाजारभाव, जनावरांना होणारे आजार त्यांची घ्यावयाची काळजी, लसीकरण. सेंद्रिय शेती यासोबतच शेतीसाठी लागणारे कीटकनाशके प्रामुख्याने निंबोळी अर्क (५%), दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, कंपोस्ट खत तसेच जैविक खत तयार करणे आणि वापराबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिदुतांनी गावात विविध ठिकाणी फलक लावणे की जे शेतकऱ्यांना विविध गोष्टीची माहिती देतील. यासोबतच गावातील अनेक समस्यांवर चर्चा झाली. पारंपरिक शेताबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित फुल शेती, हरित गृह आणि विविध फळबागांचे नियोजन यावर मार्गदर्शन केले.
गावात गटशेती बचत गटाच्या माध्यमातून नव्या योजना कशा आणता येतील यातून गावात रोजगार निर्मिती आणि आर्थिक उत्पन्न कसे वाढवू शकतो याचेही मार्गदर्शन केले.
या कामासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य-डॉ.एन.एम.मस्के ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी प्रा.व्ही.ओ.कोहीरे पाटील, डॉ.एन.एस.रोडे, डॉ. आर.सी.आगळे, डॉ.एस.बी.सातपुते, प्रा.आर.ए.शेळके, प्रा.बी.जी. म्हस्के, प्रा.एम.एस.लवराळे, डॉ.ए.के.चौधरी, प्रा.पी.बी.चोपडे, डॉ. बी.एन.थोरात, प्रा.एस.जी.लंगडे इत्यादींचे यथोचित
सर मार्गदर्शन लाभले. यावेळी गावातील शेतकरी भरत पवार, सोपान मदगे, अप्पासाहेब घोडके, बंडू शेजूळ हे उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close