Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

ब्रिटनहून औरंगाबादेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

इंग्लंडहुन आलेल्या प्रवाशांवर प्रशासनाचे विशेष लक्ष


औरंगाबाद दि 25 : ब्रिटनहून औरंगाबादेत आलेली एक ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिला ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनची लागण तर झालेली नाही ना, याच्या तपासणीसाठी या महिलेच्या लाळेचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून हळूहळू सुटका होऊ लागलेल्या औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यामध्ये इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. 25 नोव्हेंबरपासून शहरामध्ये 44 नागरिक इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत. या सर्वांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेली आहे. या सर्व प्रवाशांचा पालिका प्रशासन शोध घेत असून त्यांच्या RTPCR चाचण्या करत आहे.
याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज झालेल्या District Task Force च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

25 नोव्हेंबरपासून आलेल्या 44 प्रवाशांपैकी 11 जणांची RTPCR चाचणी करण्यात आली असून यामध्ये एक महिला पॉझिटीव्ह आढळली आहे. ह्या महिलेमध्ये कोणतेही लक्षण आढळून आलेली नाहीत. सध्या तिची तब्यत स्थिर असून तिच्यावर सेठ नंदलाल धुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ह्या महिलेला पूर्वीपासून कोविडची लागण झालेली होती का शहरात आल्यावर लागण झाली याबाबत तसेच तिच्यात आढळलेला विषाणू हा नेहमीचा आहे की नवीन स्ट्रेंथमधील आहे याबाबत संशोधन करण्यासाठी सदर महिलेचा स्वँब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (National Institute Of Virology) पाठविला असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.
इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांमधील पॉझिटिव्ह निघणाऱ्या प्रवाशांना कोविड सेंटर अथवा DCC मध्ये न ठेवता त्यांची सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निगेटिव्ह येणाऱ्या प्रवाशांना आणि संशयतींना विलगीकरणासाठी शहरातील The ONE या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

आवाहन

जे प्रवासी मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाने कळवावे आणि त्यांनी स्वतःची RTPCR टेस्ट करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close